अमरावतीत नवनीत राणांचा पराभव, कॉंग्रेसच्या बळवंत वानखडेंनी दाखवला इंगा
Amravati Loksabha Election 2024 Winner : विदर्भातील सर्वात हॉट मतदारसंघ असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांनी पराभव केला. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Uttar Pradesh Loksabha Election Result : भाजपला धक्काच! उत्तर प्रदेशात ‘सायकल’ सुसाट पळाली…
एक्झिट पोलमध्ये अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा विजयी होतील, अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. मात्र आज आलेल्या निकालात अमरावतीत धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. काँग्रेसचे बळवंत वानखडेंनी नवनीत राणांना पराभवाची धूळ चारली आहे.बळवंत वानखडे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपच्या नवनीत राणा यांचा 19 हजार 731 मतांनी पराभव केला. वानखडे यांना 5 लाख 26 हजार 271 मते मिळाली, तर नवनीत राणा यांना 5 लाख 6 हजार 540 मते मिळाली.
उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जलवा; भाजपला-शिंदेंना सहा जागांचा फटका
पहिल्या फेरीत काँग्रेसच्या वानखडे यांनी आघाडी घेतली, मात्र चौथ्या आणि पाचव्या फेरीत राणा यांना बहुमत मिळाले. पाचव्या फेरीपासून अकराव्या फेरीपर्यंत वानखडेंनी पुन्हा आघाडी कायम राखली. तेराव्या आणि चौदाव्या फेरीत राणा पुढे राहिल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र त्यानंतरच्या टप्प्यात वानखेडे यांनी बहुमत राखले. शेवटच्या फेरीत वानखडेंनी राणा यांचा 19 हजार 731 मतांनी पराभव केला.
नवनीत राणा गेल्या 2019 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळी भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिली होती. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला. बच्चू कडू यांनी नवनीत राणांच्या विरोधात दिनेश बुब यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळं अमरावतीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होतं. अखेर ही लढत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी जिंकली. त्यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला.
नाना पटोले ठरले भाजपला भारी! विदर्भातील सात जागांवर कॉंग्रेसला मोठा लीड, पटोलेंची कॉलर होणार टाईट…
नवनीत राणा यांनी गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयाची चव चाखली होती. मात्र यावेळी भाजपच्या कमळावर निवडणूक लढवून काहीही फायदा झाला नाही. बळवंत वानखडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
बोगस जात प्रमाणपत्रामुळं वाढल्या होत्या अडचणी
दरम्यान, बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली होती. मात्र, निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणात दिलासा मिळाला होता. त्यामुळे त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता.