नाना पटोले ठरले भाजपला भारी! विदर्भातील सात जागांवर कॉंग्रेसला मोठा लीड, पटोलेंची कॉलर होणार टाईट…

नाना पटोले ठरले भाजपला भारी! विदर्भातील सात जागांवर कॉंग्रेसला मोठा लीड, पटोलेंची कॉलर होणार टाईट…

Elections Results : लोकसभा निवडणुकीची Loksabha Election) मतमोजणी सकाळीपासून सुरू झाली असून काही वेळातच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. देशात सध्या एनडीए आघाडीवर असून त्याच्या उलट चित्र महाराष्ट्रात आहे. राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लीड अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. 48 जागांपैकी 27 जागांवर मविआ पुढं आहे. यात कॉंग्रेसने (Congress) लक्षणीय कामगिरी केली आहे.

राज्यातील दोन्ही राजे लोकसभेत! उदयनराजेंनी वचपा काढला तर कोल्हापुरकरांचंही छत्रपतींच्या गादीलाच मत 

विदर्भातील दहापैकी सात ठिकाणी कॉंग्रेसने दुपारी 12 वाजेपर्यंत एक लाखाने लीड घेतले आहेत. त्यात चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीत या जागांचा समावेश आहे. अकोल्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर हे उमेदवार आहेत. तिथे त्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण तिथं अभय पाटील आघाडीवर आहेत.

Lok Sabha Election Result: अभिनेत्री नव्हे खासदार म्हणा! कंगना रणौतचा मंडी मतदार संघातून मोठा विजय 

तर विदर्भातील सर्वात हॉट मतदारसंघ असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नवनीत राणा आणि कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यात काट्याची लढत सुरू आहे. अमरावती देखील कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांना 3 लाख 51 हजार 020 मते मिळाली असून ते 1 लाख 6 हजार 466 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपच्या नवनीत राणा यांना 3 लाख 34 हजार 554 मते मिळाली असून त्या 1 लाख 6 हजार 466 मतांनी पिछाडीवर आहेत.

Andhra Pradesh Election: विधानसभा निवडणुकीत NDAची बाजी! आंध्र प्रदेश भाजपची सत्ता जवळपास निश्चित 

चंद्रपूरमध्ये भाजपला धक्का
तर चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना आतापर्यंत 4 लाख 75 हजार 064 मते मिळाली आहेत. तर सुधीर मुनगटींवर यांना 301726 मते मिळाली असून ते 173338 पिछाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलने चंद्रपूर लोकसभेतून आमदार प्रतिभा धानोरकरांनी आघाडी मिळेल तर भाजपचे उमेदवार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असतील असा अंदाज वर्तवला होती. तेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

खरंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता. गेल्या वेळी चंद्रपूरमधून कॉग्रेसचे बाळू धानोकरकर विजयी झाले होते. त्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. आणि आता त्यांनी भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांवर 1 लाख मतांहून अधिक आघाडी मिळवली.

काँग्रेसने 17 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातील कॉंग्रेस 11 ठिकाणी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत लीडवर होती. तसेच सांगलीतून त्यांचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे देखील राज्यात आघाडीवर आहेत. विशाल पाटलांचा विजय देखील कॉंग्रेसचा विजय आहे. एकूणच पटोले यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसने राज्यात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी कॉंग्रेसची साथ सोडूनही कॉंग्रेसने उल्लेखनीय कामगिरी केली. कॉंग्रेसच्या घवघवीत यशामुळं पटोलेंची कॉलर दिल्लीत टाईट होणार आहे. तसेच विधानसभेच्या जागावाटपात त्यांची बार्गेनिंग पॉवरही वाढणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज