Andhra Pradesh Election: विधानसभा निवडणुकीत NDAची बाजी! आंध्र प्रदेश पुन्हा चंद्राबाबू CM

Andhra Pradesh Election: विधानसभा निवडणुकीत NDAची बाजी! आंध्र प्रदेश पुन्हा चंद्राबाबू CM

Andhra Pradesh Election 2024: आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Andhra Pradesh Election ) तेलगू देसम पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत (Andhra Pradesh) टीडीपी युती 175 पैकी 130 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) 9 जून रोजी अमरावती येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जगन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नझीर यांच्याकडे वेळ मागितला आहे आणि ते आज दुपारी 4 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सादर करतील अशी अपेक्षा आहे. यानंतर चंद्राबाबू नायडू सरकार स्थापनेचा दावा करू शकतात.

टीडीपी 130 जागांवर आघाडीवर

आंध्र प्रदेश विधानसभेत TDP 175 पैकी 130 जागांवर आघाडीवर आहे. तर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी वायएसआरसीपीची अवस्था अत्यंत वाईट आहे. YSRCP 17 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 20 जागांवर पुढे आहेत. मात्र, काँग्रेसला येथे खातेही उघडता आलेले नाही.

पियुष गोयलांनी भाजपचा गड राखला; उत्तर-मुंबईत काँग्रेसच्या भूषण पाटलांचा पराभव

पीएम मोदींनी विजयाबद्दल अभिनंदन केले

आंध्र प्रदेशातील एनडीए आघाडीच्या नेत्रदीपक कामगिरीनंतर चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. युतीला सर्वाधिक जागा मिळाल्याबद्दल पीएम मोदी आणि अमित शहा यांनी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे अभिनंदन केले आहे.

एक्झिट पोलमध्ये काय भाकीत केले होते?

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने NDA आघाडीला मोठ्या विजयाचा अंदाज वर्तवला होता, ज्यामध्ये TDP-BJP आणि JSP युतीला 100 पेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा होती. सत्ताधारी वायएसआरसीपीला 55 ते 77 जागा मिळण्याची अपेक्षा होती. जागावाटपाच्या अंतर्गत, टीडीपीने 144 विधानसभा आणि 17 लोकसभेच्या जागा लढवल्या तर भाजपने सहा लोकसभा आणि 10 विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले. तर जनसेना पक्षाने लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या २१ जागांवर निवडणूक लढवली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज