पियुष गोयलांनी भाजपचा गड राखला; उत्तर-मुंबईत काँग्रेसच्या भूषण पाटलांचा पराभव

पियुष गोयलांनी भाजपचा गड राखला; उत्तर-मुंबईत काँग्रेसच्या भूषण पाटलांचा पराभव

LokSabha Election Result Piyush Goyal Win Bhushan Patil defeat : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ( LokSabha Election Result ) सुरू असून राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटे की टक्कर असताना उत्तर-मुंबईचा गड भाजपच्या पियुष गोयल ( Piyush Goyal ) यांनी सर केला आहे. काँग्रेसच्या भूषण पाटील ( Bhushan Patil ) यांचा पराभव केला आहे.

Sangli Loksabha : सांगलीत आम्हीच किंग! विशाल पाटलांनी सिद्ध करुन दाखवलंच…

मुंबईतील लोकसभेची जागा उत्तर मुंबई ही भाजपासाठी सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. कारण 2004 आणि 2009 चा काँग्रेसला मिळालेल्या विजयाचा अपवाद सोडता. 1989 पासून लागोपाठ भाजपने उत्तर मुंबईचा गड राखला आहे. मात्र यावेळी भाजपकडून दोन वेळा खासदार राहिलेला गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना मैदानात उतरवलं होतं. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या मतदारसंघात देखील मराठी अमराठी किंवा बाहेरून आलेला उमेदवार अशा प्रकारचा प्रचार महाविकास आघाडीकडून केला गेला.

उद्धव ठाकरेंचा पहिला विजय अनिल देसाईंनी खेचून आणला; शिंदेंच्या शिवसेनेच्या राहुल शेवाळेंचा पराभव

त्यामुळे जातीय समीकरण, भाषेचा मुद्दा, भूमिपुत्रांचा मुद्दा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अवतीभवती मुंबईतील या सहाही लोकसभा जागांसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडलं. त्यात विरोधकांच्या प्रचाराच्या सर्व मुद्द्यांना मागे सारत भाजपचा गेल्या कित्येक वर्षांपासून असलेला गड कायम राखला आहे. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटलांचा पराभव केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज