Lok Sabha Election Result: अभिनेत्री नव्हे खासदार म्हणा! कंगना रणौतचा मंडी मतदार संघातून मोठा विजय

Lok Sabha Election Result: अभिनेत्री नव्हे खासदार म्हणा! कंगना रणौतचा मंडी मतदार संघातून मोठा विजय

Lok Sabha Election Result 2024: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) तिच्या पहिल्या निवडणुकीतच विजय मिळवला आहे. भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. (Lok Sabha Election) मंडी मतदार संघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते. कंगना रनौत यांनी मंडी लोकसभा जागेवर जोरदार प्रचार केला आणि विजय मिळवला.

अभिनेत्रीची ही पहिलीच निवडणूक असून कंगनाने पहिली निवडणूक जिंकली आहे. कंगना यांनी विक्रमादित्य सिंह यांच्यावर 73 हजार मतांनी मात केली आहे. कंगना रनौत यांना 503790 जनतेनं मत दिलं. विक्रमादित्य सिंह यांना 430534 मतं मिळाली आहेत. कंगना यांच्या विजयानंतर मंडी मतदार संघात आनंदाचं वातावरण आहे.

कंगना पहिल्यांदाच राजकारणात हात आजमावत आहे. आपल्या स्पष्टवक्ते भाषणामुळे चर्चेत असलेल्या कंगनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर ती निवडणूक जिंकली तर ती तिच्या फिल्मी करिअरला अलविदा म्हणू शकते, कारण तिला एका कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. कंगनाला विचारण्यात आले की ती चित्रपट आणि राजकारण एकत्र कसे सांभाळेल, ज्यावर तिने थेटच सागितलं आहे. ‘मी चित्रपटांमध्ये गुंतलेली आहे, मी भूमिका करते आणि दिग्दर्शनही करते. राजकारणात लोक माझ्यासोबत येण्याची शक्यता दिसली, तरच मी राजकारण करेन. मला फक्त एकच गोष्ट करायची आहे. कंगनाच्या या विधानानंतर असे मानले जात आहे की जर ती निवडणूक जिंकली तर ती चित्रपट जगताला अलविदा म्हणू शकते.

महाराष्ट्र, युपीमध्ये भाजपला धक्का तर, ‘या’ दोन राज्यात मुसंडी

कंगनाला पद्मश्री, 4 राष्ट्रीय आणि 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले

कंगनाने आतापर्यंत 42 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2020 मध्ये त्यांनी मणिकर्णिका फिल्म्स हे प्रोडक्शन हाऊसही सुरू केले. पद्मश्री, 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. कंगना अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर कंगना 12वी पास असून तिच्याकडे 91 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज