Solapur Loksabha : अखेर सोलापुरकरांनी बीडचं पार्सल पाठवलं! प्रणिती शिंदे खासदार बनल्या…

Solapur Loksabha : अखेर सोलापुरकरांनी बीडचं पार्सल पाठवलं! प्रणिती शिंदे खासदार बनल्या…

Solapur Loksabha : सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणित शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांचा मोठ्या फरकाने पराभव करत पाणीच पाजलंय. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, सोलापुरात प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्या चांगलंच वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत होतं. दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला होता, अखेर निवडणुकीचा निकालाच्या दिवशी प्रणिती शिंदे यांनीच बाजी मारलीयं. प्रणिती शिंदे यांना 23 व्या फेरीअखेर 5 लाख 92 हजार 180 मते मिळाली असून महायुतीचे राम सातपुते यांना 5 लाख 11 हजार 31 मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदे मतमोजणीच्या अखेरच्या फेरीत 81 हजार 149 च्या लीडने पुढे आहेत. अद्याप निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नसून शिंदेंचाच विजय निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.

Hatkanangale Loksabha : धैर्यशील मानेंनी गड राखलाच! इचलकरंजीने तारल्याने 40 हजारांचा लीड…

आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास सोलापुरात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचंच दिसून आले आहेत. दुपारनंतर अकराव्या फेरीअखेरीस प्रणिती शिंदे यांना 2 लाख 76 हजार 747 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार राम सातपुतेंना 2 लाख 76 हजार 747 मते मिळाली आहे. अकराव्या फेरीअखेरीस राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्या 24 हजार मतांचा फरक दिसून येत होता. आता मात्र, 88 हजारांच्या लीडने शिंदे आघाडीवर आहेत.

ठाण्याचा बालेकिल्ला शिंदेंचाच, ठाकरेंचा शिलेदार राजन विचारे मोठ्या पराभवाकडे, नरेश म्हस्के ठरले जायंट किलर

सोलापुरात लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपचे राम सातपुते, काँग्रेसचे प्रणिती शिंदे, अर्जून ओहोळ, कुमार लोंढे, युगंधर ठोकळे, आशिष बनसोडे, विजयकुमार उघडे, कृष्णा भिसे, सुदर्शन खंदारे, महासिद्ध गायकवाड, परमेश्वर गेजगे, नागमूर्ती भंते, रमेश शिखरे, श्रीविद्या दुर्गादेवी, सचिन म्हस्के, सुनिलकुमार शिंदे, सुभाष गायकवाड, शिवाजी सोनवणे, हे रिंगणात होते. मात्र, वंचितच्या उमेदवाराने माघार घेतल्याने प्रणित शिंदे आणि राम सातपुते यांच्यातच चुरशीची फाईट होणार असल्याचं बोललं जात होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज