ठाण्याचा बालेकिल्ला शिंदेंचाच, ठाकरेंचा शिलेदार राजन विचारे मोठ्या पराभवाकडे, नरेश म्हस्के ठरले जायंट किलर

ठाण्याचा बालेकिल्ला शिंदेंचाच, ठाकरेंचा शिलेदार राजन विचारे मोठ्या पराभवाकडे, नरेश म्हस्के ठरले जायंट किलर

Lok Sabha 2024 Results : संपूर्ण राज्यचे लक्ष लागून असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात (Thane Lok Sabha 2024) पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला वर्चस्व सिद्ध केले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आघाडी घेतली आहे तर विद्यमान खासदार राजन विचारे हे पिछाडीवर पडले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नरेश म्हस्के यांना 1 लाख 18 हजार 179 मतांची आघाडी आहे. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट लढत होत असल्याने ही लढत प्रतिष्ठेची मानली जात होती.

मात्र समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार ठाणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात वर्चस्व सिद्ध करत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

मोदी सरकारला धक्का, स्मृती इराणीसह 9 मंत्री मागे, यूपी-राजस्थानमध्ये गणित बिघडलं

उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता मात्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या बालेकिल्यात वर्चस्व सिद्ध करत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube