नितीन गडकरी यांची हॅटट्रीक, विकास ठाकरेंचा मोठ्या मताधिक्याने पराभव
Nagpur LokSabha : देशातील लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) कल आता हाती येण्यास सुरवात झाली आहे. विदर्भातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून (Nagpur Lok Sabha Constituency) भाजप नेते आणि केद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अखेरच्या फेरीत गडकरींना 1.25 लाख मतांना आघाडी मिळवत कॉंग्रेसच्या विकास ठाकरेंचा दणदणीत पराभव केला.
नागपूरात भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात होते. तर कॉंग्रेसकडून विकास ठाकरे हे यांच्यात थेट लढत झाली आहे. या निवडणुकीत विकास ठाकरे विजयी होतील, असा विश्वास कॉंग्रेसला होता. तर गडकरींनी मागील दोन्ही निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकली होती.त्यामुळं या निवडणुकीत गडकरी विजयी होतील, याची आशा भाजपला होती. दरम्यान, गडकरींना 1.25 लाख मतांना आघाडी मिळवत कॉंग्रेसच्या विकास ठाकरेंचा दणदणीत पराभव केला. गडकरींच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या निवासस्थानासमोर मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.’
Pune Loksabha : पुण्याची जागा भाजपचीच! बापटांनंतर मोहोळांच्या हाती कमान, धंगेकरांचा पराभव
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी हातात गडकरी यांना पंतप्रधान करा, अशा आशयाचे फलक घेऊन गडकरींच्या घरासमोर एकच जल्लोष केला.
गडकरी तिसऱ्यांदा खासदार
दरम्यान, सलग तिसऱ्यांदा विजयी मिळवणारे गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातील दुसरे नते ठरले आहेत. यापूर्वी काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी हॅट्ट्रिक केली होती. ते सलग चार वेळा निवडणुका जिंकले होते. 2014 मध्ये मुत्तेमवार यांचा पराभव करून गडकरी लोकसभेत पोहोचले. 2019 आणि 2024 मध्ये त्यांनी दोनदा नागपूरमधून विजय मिळवला होता. या निवडणुकीतही ते विजयी झाले. गडकरींच्या विजयात त्यांनी केलेल्या विकास कामांचं मोठं श्रेय जातं, असं बोलल्या जातं.