लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष लोप पावतील…; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष लोप पावतील…; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Prithviraj Chavan on Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 11 जागांवर उमेदवारांचे भवितव्य उद्या ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दरम्यान, प्रचारकाळात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून (Mahayuti) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी निवडणुकीनंतर महाराष्ट्राले दोन पक्ष कुठेही दिसणार नाहीत, असा मोठा दावा केला. त्यांच्या या वक्तव्याने तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Video : भर सभेत मोदीजी म्हणाले, ”शिंदेजी तुम्हारा आवाज बैठ रहा है!” शिंदेंच्या विधानाने मेळाव्यात हशा 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज महाराष्ट्रात सहा पक्ष आमने-सामने आहेत. दोन्ही बाजूला तीन-तीन. या लोकसभा निवडणुकीनंतर त्यातील दोन पक्ष लोप पावतील, त्यांचं कुठेतरी विलीनीकरण होईल अथवा त्यातली माणसं इकडे-तिकडे पळतील. पण, दोन पक्ष दिसणार नाहीत. ही माणसं कुठं जातील, ते मी आत्ता सांगत नाही. पण दोन्ही पक्ष दिसणार नाहीत, असा दावा चव्हाण यांनी केला.

मराठी माणसांनी अर्जच करु नये, म्हणणाऱ्या ‘एचआर’चा माफीनामा : शिंदे सरकारकडूनही जाहिरातीची दखल 

निवडणुकांविषयी बोलतांना चव्हाण म्हणाले की, प्रत्येकाला आश्चर्यचा धक्का बसेल एवढा चांगला निकाल मविआच्या बाजूने लागेल. 48 पैकी 25-26 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात. उत्तर महाराष्ट्रातही चांगल्या जागा येथील, असं शरद पवाराचं म्हणणं आहे. जीएसटी, महागाई, बेरोजगारी हे लोकांच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहेत. नेते काय सांगतात, यापेक्षा मोदी नकोत, ही एक सुप्त लाट आहे. मोदींना पराभव दिसू लागल्यानें मोदींची तारांबळ झाली आहे, अशी खोचक टीका चव्हाण यांनी केली.

चव्हाण म्हणाले, तुम्ही 400 पारचा नारा दिला आहे, तुमचं निर्विवाद बहुमत येणार असेल तर तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगा, तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर का बोलताय? मोदीजी त्यांच्या 10 वर्षांच्या कामाचा आढावा घेत नाहीत. अपूर्ण आश्वासने पूर्ण करणार का, यावरही काही बोलत नाहीत. ते फक्त काँग्रेस टीका करतात, असंही चव्हाण म्हणाले.

उदयनराजेंचा दीड लाख मतांनी पराभव
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उदयनराजेंना आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर तीनदा निवडून दिले. मात्र गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपला साथ दिली. त्या पोटनिवडणुकीत आम्ही त्यांचा ९० हजार मतांनी पराभव केला. दोन पक्ष असताना 90 हजार मतांनी पराभव झाला होता. आता तीन पक्ष आहेत, त्यामुळं दीड लाख मतांना त्यांचा पराभव होईल, असंही चव्हाण म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज