Video : भर सभेत मोदीजी म्हणाले, ”शिंदेजी तुम्हारा आवाज बैठ रहा है!” शिंदेंच्या विधानाने मेळाव्यात हशा

  • Written By: Published:
Video : भर सभेत मोदीजी म्हणाले, ”शिंदेजी तुम्हारा आवाज बैठ रहा है!” शिंदेंच्या विधानाने मेळाव्यात हशा

ठाणे : शिंदेंची आपका आवाज बैठ रहा है! असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एका सभेत म्हणाले होते आणि तिसऱ्या सभेत म्हणाले बैठ गया असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते ठाण्यात महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. (Eknath Shinde Thane Mahayuti Melava Speech)

साहेब, तुम्ही तब्बेत जपा, आता आम्ही खिंड लढवतो..! शरद पवारांसाठी बीडच्या शिलेदाराचे भावूक उद्गार

अरे बाबा मला बोलू द्या रे…

ठाण्यात आज (दि.6) महायुतीच्या कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन करण्या आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करण्यासाठी म्हणून शिंदे मंचावर उभे राहिले. पण कार्यकर्त्यांच्या घोषणेमुळे त्यांना दोनदा भाषणासाठी थांबावे लागले. काही केल्या घोषणा थांबताना दिसून येत नसल्याचे लक्षात येताच शिंदेंनी ‘ए बाबा थांबा जरा बोलू द्या’ असे म्हणत एक तर, आवाज बसलाय माझा भाषण करून करून असे शिंदे म्हणाले. एवढं बोलून शिंदेंनी एक किस्सा सांगितला. ज्यात मोदीजी (Narendra Modi) मला म्हणाले होते की, शिंदेंची आपका आवाज बैठ रहा है आणि तिसऱ्या सभेत म्हणाले बैठ गया. असे शिंदेंनी सांगितले. त्यावेळी इसका कुछ करते हो की नहीं त्यावर यावर ट्रिटमेंट सुरू असल्याचे उत्तर आपण मोदीजींना दिल्याचे शिंदे म्हणाले.

डिजिटल जाहिरातींमध्ये भाजप अव्वल! गुगल-युट्यूबला दिल्या 100 कोटींच्या जाहिराती

महायुतीत भाजपचं सर्व निर्णय घेते…

बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपसोबत एकत्र आले. त्यानंतर त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान करण्यात आले. पण शिंदे हे नावापुरते मुख्यमंत्री असून, सर्व निर्णय भाजपचं घेते असा आरोप विरोधीपक्षांकडून सातत्याने केला जातो. त्यात आता शिंदेंनी वरील किस्सा सांगितल्याने खरचं महायुतीत शिंदेंचा आवाज बसला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, शिंदेंच्या या विधानामुळे अनेक तर्कवितर्कांनी जोर धरला आहे.

काँग्रसचा स्टार प्रचारक पुन्हा मैदानात; राजीनामा मागे घेत नसीम खान यांचा यू-टर्न

ठाण्यात म्हस्के विरूद्ध विचारे लढत

लोकसभेसाठी महायुतीकडून ठाण्यात शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, ठाकरे गटाकडून रान विचारे मैदानात आहेत. त्यामुळे दोन शिवसैनिकांंमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी शिंदेंनी राजन विचारेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राजन विचारे आनंद दिघेंचा नकली शिष्य असून, उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघेंना खूप जास्त त्रास दिल्याचे मोठे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज