मातोश्रीबाहेर मुस्लिम समाज आक्रमक, ठाकरेंविरोधात घोषणाबाजी, नेमकं घडलं काय?
Uddhav Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर आज मुस्लिम समाजाने ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ बोर्ड विधेयकाला (Waqf Board Bill) उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांनी विरोध न केल्याने आज मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मातोश्रीबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.
ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील मातोश्रीबाहेर मोठा संख्यामध्ये जमायला सुरुवात झाली आहे. आज उद्धव ठाकरे ठाण्यात आयोजित सभेसाठी बाहेर पडणार आहे. त्यामुळे सध्या मातोश्री बाहेर मोठ्या संख्यामध्ये पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. माहितीनुसार, उद्धव ठाकरे जेव्हा सभेसाठी बाहेर निघणार त्यावेळी मुस्लिम समाजाकडून त्यांच्या विरोध केला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा संख्येमध्ये मत दिले मात्र तरीही देखील उद्धव ठाकरे वक्त बोर्ड संदर्भात का बोलत नाही? असा प्रश्न आता मुस्लिम समाज विचारत आहे.
तर दुसरीकडे लोकसभेत वक्फ कायद्यात सुधारणा विधायक केंद्र सरकारने मांडल्यानंतर या विधेयकाविरोधात विरोधी पक्षांकडून होणारा विरोध पाहता केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेत या वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 संयुक्त संसदीय समितीकडे म्हणजेच जेपीसीमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेत केंद्रीय अल्पसंख्याक कार्य आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी एकूण 31 सदस्यांच्या नावांची घोषणा केली.
लोकसभेच्या 21 तर राज्यसभेच्या 10 सदस्यांचीही नावे जेपीसीमध्ये जाहीर करण्यात आली आहे. जेपीसी पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात यासंदर्भातील अहवाल सभागृहात सादर करण्यात येणार असल्याची माहिती देखील किरेन रिजिजू यांनी दिली.
भारीच, 10 मिनिटांत घर पोहोच मिळणार पासपोर्ट फोटो, Blinkit करणार मदत ; जाणून घ्या खर्च
सरकारकडून या समितीमध्ये या विधेयकाला सर्वात जास्त विरोध करणारे AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या देखील समावेश करण्यात आला आहे तसेच काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.