FIR No 469: किरण गायकवाड नव्या रूपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘एफआयआर नंबर 469’ सिनेमाचे पोस्टर लॉन्च

FIR No 469: किरण गायकवाड नव्या रूपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘एफआयआर नंबर 469’ सिनेमाचे पोस्टर लॉन्च

F.I.R.No.469 Movie Poster Launch: ‘देवमाणूस’, ‘लागिरं झालं जी’ अशा गाजलेल्या मालिका तर ‘चौक’, ‘फकाट’, ‘डंका हरी नामचा’ अशा प्रदर्शित झालेल्या व आगामी ‘नाद’, ‘आंबट शौकीन’ या आगामी चित्रपटांतून अभिनेता म्हणून चमकलेला अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. ‘एफ.आय.आर. नंबर 469’ असे (FIR No 469 Movie) या चित्रपटाचे नाव असून नुकतचं (FIR No 469 Movie Poster Launch) सिद्धिविनायक मंदिर मुंबई येथे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या उपस्थितीत चित्रपटाचे टीजर पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Shakuntla Gaikwad (@kiran_gaikwad12)


बिग ब्रेन प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अगरवाल यांनी ‘एफ.आय.आर. नंबर 469’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अर्चना भुतडा या सहनिर्मात्या आहेत. अभिनेता प्रसाद ओक, नचिकेत पूर्णपात्रे अभिनेत्री अमृता धोंगडे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपट पहायला मिळणार आहेत. योगेश कोळी छायांकन, विजय गावंडे संगीत दिग्दर्शन, योगेश इंगळे कला दिग्दर्शक तर अजिंक्य फाळके कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहणार आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.

Naad Movie: रोमँटिक-ऍक्शन लव्हस्टोरी ‘नाद’चे कडक मोशन पोस्टर प्रदर्शित

कसदार अभिनेता म्हणून किरण गायकवाडने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने निवडलेल्या मालिका, चित्रपटांतून त्याचा अभिनेता म्हणून असलेला कल दिसतो. त्यामुळे आता दिग्दर्शन म्हणून पदार्पण करताना त्याने चित्रपटासाठी निवडलेला विषय काय, या बाबत कुतूहल आहे. त्याशिवाय ‘”एफ.आय.आर. नंबर 469″ या नावातून हे कथानक पोलिस तपासाचं असल्याचा अंदाज बांधता येत असला तरी विषय समजून घेण्यासाठी चित्रपटाचा ट्रेलर येईपर्यंत प्रेक्षकांना अजून थोडे थांबावं लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube