FIR मध्ये राज ठाकरेंचं नाव घेत मिटकरींची फिर्याद; गाडी फोडणाऱ्या मनसैनिकाचाही झाला मृत्यू
Amol Mitkari FIR Raj Thackeray Mns Activist Dead who Broke Car : विधान परिषदेचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी (MNS Activist) फोडली होती. या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी आणि मनसे आमनेसामने आले आहेत. तर मिटकरी यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारीत राज ठाकरेंचंही (Raj Thackeray) नाव आलं आहे. त्याहूनही धक्कादायक म्हणजे मिटकरी यांची गाडी फोडणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
उद्या मनिका बत्रा, पीव्ही सिंधू गाजवणार मैदान, एका क्लीकवर जाणून घ्या भारताचे वेळापत्रक
नेमकं काय झालं?
राज ठाकरे यांच्यावर सुपारी बाज म्हणत टीका केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडी फोडली होती. त्यानंतर आता मिटकरी यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्या एफआयआरमध्ये राज ठाकरे यांचं देखील नाव आलं आहे.
Paris Olympics 2024: बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागने रचला इतिहास, क्वार्टर फायनलमध्ये धडक
त्याहूनही धक्कादायक म्हणजे मिटकरी यांची गाडी फोडणारे मनसेचे कार्यकर्ते जय मालोकर यांचा संध्याकाळी मृत्यू झाला आहे. गाडी फोडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना अकोल्यामध्ये रूग्णालायात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर मनसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचा दौरा केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत, पण ते नसतानाही धरणं वाहिलं. मुळा – मुठा नदीत अनधिकृत बांधकामे झाली आहे त्यामुळे आता अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. सरकारने या गोष्टींचा विचार करणं गरजेचे आहे. मुसळधार पावसामुळे अनेक लोकांची वाहने पाण्याखाली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यावर पुण्याची पूरस्थिती हाताळण्यात अपयश आल्यावरून ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
त्यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुपारीबाचा शब्द वापरत राज ठाकरेंना उत्तर दिलं होतं मिटकरी म्हणाले होते की, दिलेल्या शब्द पाळणाऱ्या अजितदादांवर सुपारी बहाद्दरांनी बोलू नये सुपारी बहाद्दरांचं टोल नाका भोंगे किंवा अन्य कोणतेही आंदोलन यशस्वी झालं नाही त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे. राज्याच्या इतिहासातील सार्वधिक अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लावला होता. यावरूनच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी थेट मिटकरींची गाडी फोडल्याची घटना घडली आहे.