आज मनिका बत्रा, पीव्ही सिंधू गाजवणार मैदान, एका क्लीकवर जाणून घ्या भारताचे वेळापत्रक
Paris Olympics Day 5 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics 2024) चौथ्या दिवशी पुन्हा एकदा मनू भाकरने (Manu Bhaker) जबरदस्त कामगिरी करत सरबज्योत सिंगसह (Sarabjot Singh) मिळून भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. त्यामुळे आता या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात 2 पदक जमा झाले आहे. 10 मीटर मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंगला कांस्यपदक जिंकले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी म्हणजे आज भारताची टेबल टेनिस स्टार मनिका बत्रा राऊंड ऑफ 16 मध्ये सामना खेळणार आहे तर टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती महिला बॉक्सर लोव्हलिना बोरगोहाई देखील ऑलिम्पिक मोहिमेला सुरुवात करणार आहे.
तर दुसरीकडे पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूही दुसऱ्या राऊंडमधील सामना खेळणार आहे. सिंधूचा सामना क्रिस्टीन कुउबाशी होणार आहे तर लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय हे देखील आपापल्या ग्रुपमधील सामने खेळणार आहे. याच बरोबर बॉक्सिंग 71 किलो गटात निशांत देव राऊंड ऑफ 16 मध्ये सामना खेळणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी भारताचे वेळापत्रक
शूटिंग
पुरुष : 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स पुरुषांची पात्रता सामना, ऐश्वर्या प्रताप सिंग आणि स्वप्नील कुसाळे (दुपारी 12:30 वाजता)
महिला : ट्रॅप पात्रता सामना, श्रेयसी सिंग आणि राजेश्वरी कुमारी (दुपारी 12:30 वाजता)
बॅडमिंटन
महिला एकेरी (ग्रुप स्टेज): पीव्ही सिंधू विरुद्ध एस्टोनिया, (दुपारी 12:50 वाजता)
पुरुष एकेरी (ग्रुप स्टेज): लक्ष्य सेन विरुद्ध इंडोनेशिया (दुपारी 1:40 वाजता )
पुरुष एकेरी (ग्रुप स्टेज): एचएस प्रणॉय विरुद्ध व्हिएतनाम (रात्री 11 वाजता )
टेबल टेनिस
महिला एकेरी (राऊंड ऑफ 32 ): श्रीजा अकुला विरुद्ध सिंगापूर (दुपारी 2:20 वाजता )
महिला एकेरी (राऊंड ऑफ 16 ): मनिका बत्रा (रात्री 8:30वाजता )
बॉक्सिंग
महिला : 75 किलो ( राऊंड ऑफ 16 ): लोव्हलिना बोर्गोहेन विरुद्ध नॉर्वे (दुपारी 3:50 वाजता)
पुरुष : 71 किलो ( राऊंड ऑफ 16 ): निशांत देव विरुद्ध इक्वाडोर (1 ऑगस्ट, रात्री 12: 18 वाजता)
तिरंदाजी
महिला एकेरी: 1 ते 32 एलिमिनेशन राऊंड : दीपिका कुमारी (दुपारी 3:56 वाजता)
पुरुष एकेरी: 1ते 32 एलिमिनेशन राऊंड : तरुणदीप राय (रात्री 9:15 वाजता )
मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, नांदेडसह ‘या’ शहराला होणार फायदा
घोडेस्वारी
वैयक्तिक ड्रेसेज ग्रँड प्रिक्स डे 2: अनुष अग्रवाला (दुपारी 1:30 वाजता)