छगन भुजबळ तुला चष्मा उचलना…तलवार कधी उचलायची; जरांगेंची खोचक टोलेबाजी

छगन भुजबळ तुला चष्मा उचलना…तलवार कधी उचलायची; जरांगेंची खोचक टोलेबाजी

Manoj Jarange On Chagan Bhujbal : छगन भुजबळ (Chagan Bhujbal) तुला चष्मा उचलना अन् तलवार कधी उचलायची, अशी खोचक टोलेबाजी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलीयं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषणानंतर राज्यभरात शांतता रॅलीचं आयोजन केलंय. राज्यातील विविध जिल्ह्यात जरांगे यांच्या रॅलीला मराठा समाजबांधवांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. जरांगेंची रॅली सध्या अहमदनगरमध्ये सुरु असून या रॅलीतून ते समाजबांधवांना संबोधित करीत आहेत.

हिंडेनबर्गच्या आरोपांनी खळबळ, अदानींना 53 हजार कोटींचे नुकसान, तरीही बाजाराने दाखवला दम

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, येत्या 29 ऑगस्टला मराठा आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे, त्या अनुषंगाने अंतरवाली सराटी येथे महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीमध्ये पाडायचं की उभा राहायचं याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जर उमेदवार उभा केला तर शंभर टक्के मराठ्यांनी मतदान करायचे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने रणशिंग फुंकलंय.

तसेच आरक्षणासाठी सत्ता गरजेची आहे जर आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकीत आपले उमेदवार उतरवू, मात्र जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी मराठा समाजाने शंभर टक्के उभे राहणे गरजेचे आहे. जर आपण येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार देणार असा आपलं ठरलं तर राजकारण्यांच्या यात्रेला जायचं नाही. समाजाच्या पाठीशी उभा आहे. जो आपल्याला आरक्षण मिळवून देणार त्यांच्या पाठीशी समाज उभा राहील त्याला आपण निवडून देणार नाही तर निवडून देण्यापेक्षा पाडापाडी हे बरं राहील असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Kanguva: बॉबी देओल पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत, ‘कांगुवा’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित

शांतता रॅलीच्या माध्यमातून राज्यात शांतता ठेवायची आहे. ओबीसीमध्ये कुठलाही वाद नाही मात्र राजकारणी वाद लावण्याचा प्रयत्न करतील. छगन भुजबळ तुला चष्मा उचलना तुला तलवार कधी उचलली जायची. भुजबळने स्वत:चं वाटोळं केलंय, राष्ट्रवादीचाही भुगा केलायं आता फडणवीसाचाही कार्यक्रम करीत आहे. छगन भुजबळ अपशकूनी पायाचा आहे तरीही देवेंद्र फडणवीस त्याचेच मुके घेत असल्याची खोचक टोलेबाजी मनोज जरांगे यांनी केलीयं.

दरम्यान, एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुरु आहे तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसी समाजाकडून जाहीर सभा घेतल्या जात आहेत. काल सांगली ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके, मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केलीय. यावेळी बोलताना भुजबळांनी जरांगेंना थेट चॅलेंजच केलंय. ते म्हणाले, हिंमत असेल तर ये मैदानात, 288 पैकी 8 आमदार निवडून दाखव, असं भुजबळ म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube