हिंडेनबर्गच्या आरोपांनी खळबळ, अदानींना 53 हजार कोटींचे नुकसान, तरीही बाजाराने दाखवला दम

हिंडेनबर्गच्या आरोपांनी खळबळ, अदानींना 53 हजार कोटींचे नुकसान, तरीही बाजाराने दाखवला दम

Hindenburg Research : अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) पुन्हा एकदा भारतीय बाजारात खळबळ उडवून दिली आहे. यावेळी हिंडेनबर्गने अदानी ग्रुप (Adani Group) प्रकरणात सेबी (SEBI) प्रमुख माधवी पुरी बुच (Madhavi Puri Buch) यांचाही संबंध असल्याचा दावा केल्याने भारतीय बाजारात सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आज बाजार उघडताच अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 229 अंकांनी घसरून 79476 वर होता. तर निफ्टी 91 अंकांच्या घसरणीसह 24276 वर व्यवहार करत होता. निफ्टी टॉप लूजर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस 2.65 टक्क्यांनी घसरला तर अदानी पोर्ट्स 1.81 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे आज सकाळी गुंतवणूकदारांचे सुमारे 53,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि अदानी ग्रुपच्या 10 कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप 16.7 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले.

हिंडेनबर्गचे आरोप काय?

हिंडेनबर्गने शनिवारी प्रकाशित केलेल्या अहवालात सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी ऑफशोअर फंडात गुंतवणूक अदानी ग्रुपला स्टॉक मार्केटमध्ये फेरफार करण्यासाठी करण्यात आली असा आरोप हिंडेनबर्गने केला होता. त्यांनी यासाठी व्हिसलब्लोअर दस्तऐवजांचा हवाला देखील दिला होता.

हिंडेनबर्गने आरोप केला की बुचांनी 2015 मध्ये गुंतवणूक केली आणि 2018 मध्ये त्या गुंतवणुकीतून बाहेर पडले. यावेळी हिंडेनबर्ग प्रत्यक्षात बुच दाम्पत्याची गुंतवणूक आणि अदानी ग्रुपच्या ऑफशोअर फंड्समधील कथित ढिलाई तपासाशी जोडण्याचा प्रयत्न केला.

हिंडेनबर्ग आपल्या अहवालात म्हटले आहे की, आम्हाला अजिबात आश्चर्य वाटले नाही की सेबी चेअरमनपर्यंत पोहोचू शकणाऱ्या संकेतांच्या आधारे तपास होत नाही.

सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांची प्रतिक्रिया

या आरोपांवर सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांनी हिंडेनबर्ग यांच्या आरोपांवर एक निवेदन जारी करत आम्ही आमच्या वैयक्तिक क्षमतेत गुंतवणूक केली होती आणि सेबी प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी सर्व आवश्यक खुलासे करण्यात आले होते. तर बुचने ज्या फंडात गुंतवणूक केली होती, आयपीई-प्लस फंड 1 ने स्वतंत्र स्टेटमेंट जारी करून सांगितले की त्यांनी अदानी ग्रुपच्या कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली नाही.

तर दुसरीकडे सेबीनेही एक निवेदन जारी करून आरोप फेटाळून लावले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हे दुर्दैवी आहे की हिंडेनबर्ग रिसर्च, ज्याच्या विरोधात सेबीने अंमलबजावणी कारवाई केली आहे आणि कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे, त्याला उत्तर देण्याऐवजी त्यांनी आमच्या विश्वासार्हतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

अदानी ग्रुपची प्रतिक्रिया

हिंडेनबर्गकडून करण्यात आलेल्या आरोपांवर अदानी ग्रुपने देखील आपली प्रतिक्रिया देत आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच या अहवालात ज्या लोकांचा आणि केसाचा उल्लेख करण्यात येत आहे त्यांच्याशी कधीही अदानी ग्रुपने कोणतेही आर्थिक व्यवहार केले नाही असं अदानी ग्रुपकडून स्पष्ट करण्यात आहे आहे.

Javad Zarif : ‘मला लाज वाटते…’, इराणच्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा, ‘हे’ आहे कारण

हिंडेनबर्ग-अदानी वाद कधी सुरू झाला?

जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात अदानी ग्रुपवर चुकीच्या पद्धतीने शेअरच्या किमती वाढवण्यासारखे अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सला 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube