20 हजार कोटी कुठून आले ? ; हा घ्या हिशोब ! राहुल गांधींच्या आरोपांनंतर अदानी ग्रुपने दिले उत्तर

20 हजार कोटी कुठून आले ? ; हा घ्या हिशोब ! राहुल गांधींच्या आरोपांनंतर अदानी ग्रुपने दिले उत्तर

Rahul Gandhi Vs Gautam Adani : जानेवारी महिन्यात आलेला हिंडेनबर्गचा अहवाल आणि त्यानंतर काँग्रेससह (Congress)अन्य विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांना अखेर अदानींनी उत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi )यांनी शनिवारी ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी लिहीले की ते सत्य लपवतात, म्हणूनच दररोज दिशाभूल करतात. अदानींच्या कंपन्यांमधील वीस हजार कोटी रुपयांचा बेनामी पैसा कुणाचा आहे ? असे म्हणत राहुल यांनी काँग्रेसच्या पाच माजी नेत्यांची नावेही अदानींशी जोडली.

राहुल गांधींनी केलेल्या या आरोपांना अदानी समूहाने (Adani Group) उत्तरे दिली. एका निवेदनात समूहाने म्हटले, की सन 2019 पासून समूह कंपन्यांनी त्यांचे स्टेक विकून त्याद्वारे 2.87 बिलियन डॉलर (23 हजार 525 कोटी रुपये) उभे केले. त्यापैकी 2.55 बिलियन डॉलर (20 हजार 902 कोटी) व्यवसायात पुन्हा गुंतवले आहेत.

सावरकरांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार

अदानी समूहाने मागील चार वर्षांतील संपूर्ण लेखाजोखा सार्वजनिक केला. एका वृत्तसंस्थेनुसार अबूधाबीस्थित इंटरनॅशल होल्डिंग कंपनीसारख्या गुंतवणूकदारांनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड सारख्या समूह कंपन्यांमध्ये सुमारे 20 हजार कोटी रुपये गुंतवले. प्रवर्तकांनी अदानी ग्रीन एनर्दीद्वारे 2.783 अब्ज डॉलर उभे केले. तर टोटल गॅस लिमिटेड व अदानी ग्रीन एनर्जीचे स्टेक विकले गेल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

अलीकडेच लंडन येथील एका वृत्तपत्राने अदानी समूहाबाबत  वृत्त प्रसिद्ध केले होते. ज्यामध्ये अदानी समूहाकडून एफडीआय प्राप्त झाल्याचे म्हटले होते. त्यातील बहुतांश अदानी यांच्या कुटुंबाशी संबंधित विदेशी कंपन्यांतून आले होते. परदेशी संस्थांनी 2017 ते 2022 पर्यंत अदानी कंपन्यांमध्ये किमान 2.6 अब्ज डॉलर्स गुंतवणूक केली आहे.

कोर्लई गावच्या 19 बंगले प्रकरणात माजी सरपंचाला बेड्या, रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ?

त्यानंतर आता समूहाने जो हा खुलासा सादर केला आहे त्याचा संबंध या विदेशी वृत्तपत्रातील वृत्त आणि देशात सुरू असलेल्या वादांशी जोडला जात आहे. समूहाने सर्वच आरोप फेटाळून लावले आहेत. समूहाने म्हटले की ज्याबाबत आता प्रश्न विचारले जात आहेत ती गुंतवणूक आधी म्हणजे 28 जानेवारी 2021 ते 23 जानेवारी 2021 या काळात जाहीर केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube