सावरकरांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस 28 मे हा दिवस गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात ट्विटरद्वारे घोषणा केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2023
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. सावरकरांच्या जन्मदिनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर शूट अॅट साईट करा; उदयनराजे भोसलेंचं खळबळजनक विधान
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, सावरकरांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.
‘अरे! हिंमत असेल तर घ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका’
सामंत यांच्या मागणीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सावरकरांच्या सन्मानार्थ सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.
या यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी दिलेलं योगदान जनतेला सांगण्यात येत असून सावरकरांना अंदमानच्या जेलमध्ये इंग्रजांच्या अमानुष अत्याचार सहन करावे लागत, असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणादरम्यान सांगत आहेत.