राज्यातील गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर शूट अॅट साईट करा; उदयनराजे भोसलेंचं खळबळजनक विधान

राज्यातील गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर शूट अॅट साईट करा; उदयनराजे भोसलेंचं खळबळजनक विधान

Udnayaraj Bhosale Says Direct shoot at sight : खासदार उदनयराजे भोसले (MP Udnayaraj Bhosale) हे आपल्या बिनधास्तपणा आणि बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात, त्यामुळं ते कायम चर्चेत असतात. आताही उदयनराजे आपल्या एक वक्तव्यांमुळे चर्चेत आले. खरंतर महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या (crime) अनेक घटना वाढत आहेत. हत्या, जीवे मारण्याच्या धमक्या अशा धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. ह्या घटनांना आळा घालायाचा असेल आणि एखादा गुन्हेगार गुन्हा करत असेल तर पोलिसांनी डायरेक्ट शुट अॅट साईट (Direct shoot at sight) करावं, असं खळबळजनक विधान खा. उदयनराजे भोसले यांनी केलं.

पुणे-बंगळुरू महार्गावरील कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाच्या आढावा खासदार उदयराजे भोसले यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने कळस गाठला आहे. मारहाण, हल्ले, खंडणी, विनयभंग अशा अनेक घटना सातत्याने घडत आहे. पोलिसांसमोर तर या वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याचं मोठं आव्हान उभं राहिल आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य माणूस जीव मुठीत धरून जगत आहे.

खुशखबर ! 10 वी उत्तीर्ण उमेवारांसाठी ठाणे महानगरपालिकेत भरती जाहिर, महिन्यला 20 हजार रुपये पगार

आपल्या कायद्यात भरपूर पळवाटा आहेत. समजा 16 ते 18 वयाच्या आतील गुन्हा करणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ झाली. या मुलांच्या हातून गुन्हा झाल्यानंतर त्यांना रिमांडहोममध्ये पाठवले जाते. नंतर काही काळ तिथं काढल्यानंतर त्यांची रिमांडहोममधून सुटका होते. माझं तर म्हणणं आहे की, एखाद्याला खलास करायचं असेल त्यासाठी त्याचे जर डोके एवढं चालत असेल तर मांग पुढं बघायचा नाही, मागचा-पुढचा विचारच करायचा नाही. डायरेक्ट शूट अॅट साईट करून टाकायचे.कारण, जोपर्यंत असं उदाहरण समाजाला दिले जाणार नाही, तोपर्यंत गुन्ह्याच्या घटना वाढतच राहणार, असं ते म्हणाले.

ते म्हणाले, राज्यातील गुन्हेगारी कशी थांबणार? कारण, कशा प्रकारे अत्याच्याराच्या घटनांना आळा बसले? कारण, वकील मंडळी भरपूर आहेत. वकील लावून स्वत:ची गुन्ह्याच्या घटनेतून सुटका करून घेता येते. समजा, मी स्वत: गुन्हा केला की, नंतर मी वकील देणार आणि बाकीचे जे आहेत त्यांच्यावर सुध्दा अत्याचार झाला आहे. मग यात ज्यांच्याकडे पैसा आहे, ते सुटणार. कारण, ज्यांच्याकडे वकील नेमण्यासाठी पैसे नाहीत. ते पोलिसांत तक्रार देणार. आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत, तो त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकणार. उलट त्यांच्यावरच पोलिस गुन्हा दाखल करतात. त्यांनाच जेलमध्ये टाकतात, असं उदयनराजे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube