गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी बहिणीच्या सासरी टाकला दरोडा; वाचा, नाट्यमय घटनाक्रम

गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी बहिणीच्या सासरी टाकला दरोडा; वाचा, नाट्यमय घटनाक्रम

Stock Market Theft : शेअर बाजारातील उलाढालींची मोठी बातमी समोर आली आहे. (Market) शेअर बाजारात हरल्यामुळे घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिसांनी दीड करोडचे दागिने अवघ्या बारा तासाच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

ओधवजी खिमजी भानुशाली, 66 वर्षे हे घरात एकटेच असताना एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून मला रूम हवी आहे मला मदत करा असं सांगून घरात घुसला. त्यांनी आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूममध्ये जायचं असं सांगून वॉशरूम मध्ये गेला आणि तुमचं बाथरूम लिकेज झाला आहे असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूममध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला.

मतांची चोरी करून सत्तेत बसलेत; वोट चोरी म्हणत उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट वार

मध्यवर्ती गुन्हे शाखेने आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता त्या सीसीटीव्हीमध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपवून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी येथे पोहोचले आणि महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडे दीड करोडचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्राम वरील मिम्स पाहून केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश केले होते. त्याप्रमाणे सदर चोरीत महिलेचाही समावेश असल्याचे दिसून आले. तपासात फिर्यादीया नातेवाईकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube