कल्याण मारहाण प्रकरणी नवा ट्विस्ट, रिसेप्शनिस्ट तरुणीने आधी आरोपीच्या वहिनीला लगावली कानशिलात…

कल्याण मारहाण प्रकरणी नवा ट्विस्ट, रिसेप्शनिस्ट तरुणीने आधी आरोपीच्या वहिनीला लगावली कानशिलात…

Kalyan Hospital Receptionist Case VIDEO: कल्याण पूर्वमधील नांदिवली भागात असलेल्या एका खाजगी रुग्णालयात (Kalyan Hospital) मंगळवारी धक्कादायक घटना घडली. रुग्णालयात करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय पुरुषाने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. या व्हिडिओमध्ये गोपाल झा (Gopal Jha) नावाचा एक व्यक्ती तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं दिसतं. आता या प्रकरणात वेगळाच ट्वीस्ट आला. समोर आलेल्या दुसऱ्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीने झा कुटुंबातील एका महिलेला कानाखाली मारल्याचं या व्हिडिओत दिसतं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून मत चोरी; काँग्रेस नेते राहुल गांधींचा पुन्हा गंभीर आरोप 

नवीन व्हिडीओमध्ये काय आहे?
सदर प्रकरणातील नवीन व्हिडिओमध्ये गोकुळ झा, रंजीत झा, त्यांची आई आणि सून उभे असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणी आणि गोकुळ झा यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये गोकुळ झाने तरुणीला आधी लाथ मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिविगाळही केली. त्यानंतर गोकुळ झाला शांत करत त्याच्या आईने रुग्णालयाच्या बाहेर पाठवले. यानंतर रिसेप्शनिस्ट तरुणीने झा कुटुंबातील एका महिलेला कानाखाली मारलं. त्यानंतर गोकुळ झा बाहेरून धावत आला आणि रिसेप्शनिस्ट तरुणीला जबर मारहाण केल्याचं व्हिडिओत दिसतं.

मारहाण करणं योग्य नव्हतं…
या घटनेबद्दल गोकुळ आणि रंजीत झाची आई म्हणाली की, सदर घटना माझ्या डोळ्यासमोर घडली आणि रिसेप्शनिस्ट मुलीने माझ्या सुनेवर आधी हात उचलला. त्या मुलीने माझ्या सुनेला शिवीगाळ केली होती. हा सर्व प्रकार गोकुळ झा याने पाहिला आणि बाहेरून धावत येत त्याने तिला लाथ मारली. मात्र, त्याने मारहाण करणं योग्य नव्हतं, असा निर्वाळाही आईने दिला. तसेच सीसीटीव्ही फुटेज कट करून दाखवले जात असल्याचा गंभीर आरोपही गोकुळच्या आईने केला आहे.

गोकुळ झाला पोलीस कोठडी…
रेसेप्शिन्सट तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळ झा याच्यासह त्याचा मोठा भाऊ रंजीत झाला याला पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, सदर मराठी तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जानकी रुग्णालयाचे डॉ. मोईन शेख यांनी सांगितले की, तिच्या मानेवर मारहाण करण्यात आली आहे. तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे वळ आहेत. आम्ही तात्काळ उपचार सुरू केले आहत. तसेच, तरुणीला मान हलवताना खूप वेदना होत आहेत. त्यामुळे या मारहाणीमुळे तिला पॅरालिसीस होण्याची शक्यता आहे. सध्या तरुणीला देखरेखीखाली ठेवण्यात आलं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube