माझ्या जीवाला धोका, पण माझ्या बहिणींचे आशीर्वाद अन्…; अजितदादांचं धुळ्यात मोठं विधान
Ajit Pawar : आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra) सुरु केली. यामाध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आज धुळ्यातील सभेला संबोधित करताना अजित पवारांनी (Ajit Pawar) माझ्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिल्याचं सांगितलं.
Kanguva: बॉबी देओल पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत, ‘कांगुवा’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित
नाशिकच्या विमानतळावर उतरलो तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी मला मालेगावला जाऊ नकोस, तुमच्या जीवाला धोका आहे, असं सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांची आज धुळ्यात सभा झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, गुप्तचर विभागाने तुम्हाला धोका असल्याची मला सूचना दिली. त्याबाबत प्रसारमाध्यमांमध्येही बातम्या आल्यात. जिथे मोठ्या संख्येनं महिला असतील, तिथं तुम्ही गर्दीत जाऊ नका. तसंच मालेगाव आणि धुळ्यात गेल्यास माझ्या जीवाला धोका असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं, असं अजित पवार म्हणाले.
Government Schemes : पोकरांतर्गत गांडूळ खत, नाडेप, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना
ते म्हणाले, पण माय माऊलींनो तुम्ही माझ्या हातावर बांधलेल्या राख्या जोपर्यंत माझ्या हातात आहेत, तोपर्यंत मला दुसऱ्या कुणाचीही आवश्यकत नाही. माझ्या बहिणींचे आशीर्वाद, राखीचे कवच आणि प्रेमाची गाठ हे मला कुठलाही धोका होऊ देणार नाहीत, असं माझं अंतर्मन सांगत आहे, असंही अजितदादा म्हणाले.
दरम्यान, गुप्तचर विभागाच्यचा सूचनेनंतर आता पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. अजित पवारांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली. त्यांच्या रॅली दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खरबदारी घेतली जाते.
दरम्यान, कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी आमची जन सन्मान यात्रा सुरूच राहणार असल्याचं सांगितलं. तसेच गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचेही ते म्हणाले.