‘खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापूरी जोडा दाखवा’; योजनांचा पाढा वाचत CM शिंदेंची चपराक

‘खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापूरी जोडा दाखवा’; योजनांचा पाढा वाचत CM शिंदेंची चपराक

Cm Eknath Shinde : खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापूरी जोडा दाखवा, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी योजनांचा पाढा वाचत विरोधकांना चपराक लगावलीयं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनांचा पाढाच वाचलायं. ते कोल्हापुरात आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यात बोलत होते.

लोक विरोध करत नाहीत तोपर्यंत तपासच करणार नाही का? न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पैसे मिळणार नाही, असं विरोधक सांगतात, ते एवढ्यावर नाही थांबले कोर्टातही गेले, असं राजकारण कोणी करु नये. एकतर विरोधकांनी दिलं नाही आम्ही देतोयं तर ते थांबवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? या योजनेमुळे आमच्या महिला भगिनींचं मोहोळ उठलंय. तुम्ही कितीही योजना बदनाम करण्याचं काम केलं तरीही आमच्या बहीणींचा विश्वास आहे, ही योजना फसवी, खोटी असल्याचं सांगणारे विरोधक कार्यालयासमोर या योजनेचे बॅनर लावत आहेत, पण त्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही स्वत:चा फोटो टाकत आहेत. काय चाललंय हे कुठे फेडाल हे पाप? या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरसले आहेत.

मोठी बातमी : जरांगेकडून भाजपला सुरूंग! बड्या नेत्याने बीडमधून जरांगेंकडे मागितली उमेदवारी

आता महिलांच्या कोणत्या योजनेत विरोधकांनी खोडा घातला तर खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापूरी जोडा दाखवा, असा जोडा दाखवला तर ते तुमच्यामध्ये येणार नाहीत. कितीही काहीही केलं तरीही ही योजना बंद होणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो जे करणार तेच आम्ही बोलणार खोटं आश्वासने देणार नाही. ज्या दिवशी रक्षाबंधन होतं, त्याच्या दोन दिवस आधी आम्ही निधी दिलायं. 14 तारखेपासूनच खात्यात पैसे होऊ लागले महिला बाल विकास टीमकडून योजनेचं जोरदार काम सुरु आहे. 1 कोटी 10 लाख बहीणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. हे आत्तापर्यंतच्या इतिहासातलं पहिलं काम असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.

दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केलीयं. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर दरमहा दीड हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेवरुन विरोधकांकडून सातत्याने टीकेची झोड उठवली जात आहे. हा चुनावी जुमला, निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन योजनांची घोषणा केली जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जातेयं. या सर्व टीकांना महायुतीकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यातून प्रत्युत्तर दिलं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube