…तर माझं बी नाव दिलीप मोहिते पाटील; भर सभेत आढळरावांना भरला दम

…तर माझं बी नाव दिलीप मोहिते पाटील; भर सभेत आढळरावांना भरला दम

Shivaji Adhalrao Patil : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील ( Shivaji Adhalrao Patil ) यांनी आज (दि.26) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. त्यावेळी एकेकाळी आढळरावांचे कट्टर विरोधक मानले जाणारे दिलीप मोहिते पाटील देखील उपस्थित होते. त्यांनी भाषणादरम्यान आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला सांगतो, पण गैरविश्वास दाखवला तर माझं बी नाव दिलीप मोहिते पाटील आहे. असं म्हणत आढळरावांना एकप्रकारे दम दिला.

राष्ट्रवादीत प्रवेश करताच आढळरावांकडून मोहिते पाटलांचं कौतुक तर कोल्हेंना प्रत्युत्तर

दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, आढळरावंशी माझा वीस वर्षाचा संघर्ष आहे. कारण मी शिवसेनेतून आल्यामुळे माझा स्वभाव तसा होत आणि ते शिवसेनेत आल्यानंतर त्यांचा स्वभाव तसा झाला आणि सारख्या स्वभावाची माणसं एकत्र येणे अवघड असतं. त्यात आढळरावांचा दोष नाही. संगतीच्या गुणांनी ते तापट झाले. त्यातून आमच्यात राजकीय संघर्ष झाला. वळसे पाटलांच्या तालुक्यातील कोणत्याही कामाला त्यांनी विरोध केला नाही. मात्र माझ्या तालुक्यात त्यांनी कायम विरोध केला. हा संघर्ष मिटवण्याचे काम आज अजित पवारांनी केलं.

Lok Sabha Election: आघाडीचा धर्म पाळला जात नाही; भिवंडी, सांगलीवरून पटोलेंनी कुणाला सुनावले?

त्यामुळे आढळरावांना हीच विनंती की, दादांप्रमाणे तुम्ही माझ्या मागे उभे रहा. त्यामुळे गट तटाचे राजकारण सोडून पक्ष पुढे नेऊ. तसेच यावेळी आपण या कार्यक्रमाला उशिरा आल्याबद्दल मोहिते पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले आढळराव पाटलांना एवढेच सांगतो की, आमच्यावर विश्वास ठेवा काम केल्याशिवाय राहणार नाही. मात्र गैरविश्वास दाखवला तर माझं नाव दिलीप मोहिते पाटील आहे. एवढेच तुम्हाला सांगतो. असं म्हणत एक प्रकारे आढळरावांना दम दिला.

यावेळी बोलताना आढळराव म्हणाले की, मी वीस वर्षानंतर स्वगृही परतत आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले दिलीपराव मोहिते पाटलांची माझे कोणतेही वैयक्तिक हेवेदावे नाहीत ते स्वभावाने अत्यंत चांगले आहेत मात्र राजकारणात समोरासमोर भांड्याला भांड लागतच असं म्हणत यावेळी आढळराव यांनी मोहिते पाटील आणि आपल्या संबंधांवर स्पष्टीकरण दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube