आंबेगावच्या विकासासाठी वळसे पाटलांचीच गरज : आढळराव पाटील

  • Written By: Published:
Shivajirao Adhalrao Patil, Dilip Walse Patil

मंचर : दिलीप वळसे पाटील यांचे नेतृत्व लाभले, हे आंबेगावच्या जनतेचे भाग्य असल्याचे म्हणत अशा दूरदृष्टीच्या नेत्याला पुन्हा संधी द्यावी. यामुळे विकासकामांची गती आणखी वाढेल, असे मत ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. मतदारसंघातील महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.

विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय काहीच नाही; वळसे पाटलांचा घणाघात

दिलीप वळसे पाटील यांनी गेली ३५ वर्षे अहोरात्र काम करून तालुक्याचा कायापालट केला. वळसे पाटील आपले नेतृत्व करत आहेत, हे आपले भाग्य असल्याचे आढळराव पाटील म्हणाले. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विविध मंत्री पदे भूषविताना घेतलेल्या निर्णयांचा आज राज्याला फायदा होताना दिसत आहे, यापुढील काळातही आपला परिसराचा विकास करून घेण्याची संधी आपल्याला मिळाली आहे असे मत जिल्हा समन्वयक रवींद्र करंजखेले यांनी व्यक्त केले.

डिंभे धरणाच्या बोगद्याचा प्रश्न मिटला, चार तालुक्यांतील बंधाऱ्यांना मिळणार पाणी; वळसेंकडून सर्व काही क्लिअर

या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे म्हणाले की, शिरूर तालुक्यातील ४२ गावे आंबेगाव तालुका मतदारसंघाला जोडली गेल्याने शिरूरमधील या प्रत्येक गावांमध्ये देखील वळसे पाटलांच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक रविंद्र करंजखेले, सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू, मारुती वागदरे, सरपंच वर्षाराणी बोराडे, उत्तम जाधव, रितेष शहा, हौसिराम मुखेकर, अध्यक्ष एकनाथ सांडभोर, रामभाऊ गायकवाड, नाना शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

follow us