महाराष्ट्रात मतदार यादीत महा घोटाळा? निवडणूक आयोगावर बॉम्ब; राहुल गांधींनी दिला पुरावा

महाराष्ट्रात मतदार यादीत महा घोटाळा? निवडणूक आयोगावर बॉम्ब; राहुल गांधींनी दिला पुरावा

Rahul Gandhi On Election Commission : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप करत कर्नाटका लोकसभा (Karnataka Lok Sabha Election) आणि हरियाणा (Haryana) आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर नवीन बॉम्ब टाकला आहे. महाराष्ट्रात 40 लाख संशयित मतदार असल्याचा दावा या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, एक्झिट पोल काहीतरी वेगळेच सांगतात पण निकाल वेगळाच लागतो. महाराष्ट्रात 40 लाख मतदार संशयित आहे. एक काळ असा होता जेव्हा देशात मतदानासाठी इलेक्टॉनिक मशीन्स नव्हत्या मात्र तरीही संपूर्ण देशात एकाच दिवशी मतदान करत असे पण आज उत्तर प्रदेशात स्वतंत्रपणे मतदान होते. बिहारमध्ये इतर वेळी मतदार होते. मतदान महिने चालते. आम्हाला याची चिंता आहे. महाराष्ट्रात 5 महिन्यांत इतके मतदार जोडले गेले आहेत जे 5 वर्षात जोडले गेले नाहीत. महाराष्ट्रात संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार जोडले गेले आहेत ज्यामुळे अधिक संशय निर्माण होते. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी देत नाही. सीसीटिव्ही फुटेज देत नाही. महाराष्ट्रात संध्याकाळी 5.30 नंतर बरेच मतदान झाले पण याचा निवडणूक आयोग पुरावे देत नाही. असं देखील माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले. तर कर्नाटक लोकसभा निवडणूकीबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, महादेवपुरा या जागेवर 1 लाख 250 मते चोरीला गेली. 11,965 डुप्लिकेट मतदार होते. 40 हजारांहून अधिक लोकांचे बनावट पत्ते होते. 10 हजारांहून अधिक मतदारांचे एकापेक्षा जास्त पत्ते होते. 4 हजारांहून अधिक जणांचे फोटो चुकीचे होते. 33 हजारांहून अधिक जणांनी फॉर्म 6 चा गैरवापर केला.

वंदे भारत एक्सप्रेस आता नगरलाही थांबणार; खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश 

यावेळी राहुल गांधी यांनी बनावट पत्त्यांचे पुरावे दाखवले, ज्यामध्ये मतदारांसमोरील घराचा पत्ता 0 असा लिहिलेला होता तर असे अनेक लोक आहे ज्यांचे वडिलांचे नाव hhgassjk होते. तर घर नंबर 35 मधील 80 मतदारांनी एकाच पत्तेवरुन मतदान केले आणि घर नंबर 791 मधून एकाच पत्तेवर 46 मतदारांनी मतदान केलेल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube