…म्हणून वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली; आढळरावांनी सांगितली ‘अंदर की बात’
मंचर : शरद पवारांचे जवळचे नेते म्हणून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) ओळखले जातात. मात्र, राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर वळसे पाटलांनी अजितदादांची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या भूमिकेवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, वळसे पाटलांनी पवारांची साथ का सोडली याबाबत ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भाष्य करत ‘अंदर की बात’ सांगितली आहे. ते सातगाव पठार भागातील गावभेट दौऱ्यात बोलत होते.
आंबेगावच्या विकासासाठी वळसे पाटलांचीच गरज : आढळराव पाटील
आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या ३५ वर्षात दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याचा परिपूर्ण विकास केला आहे. भविष्यात तालुक्यात पाण्याचा प्रश्न भविष्यात पेटणार आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. डिंभे धरणाच्या बोगद्याला विरोध करण्यासाठीच वळसे पाटील यांनी पवारांची साथ सोडल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले.
आंबेगावात वळसे पाटलांचाच गाजावाजा; सर्व्हेतून संपूर्ण चित्र स्पष्ट
मतदारसंघातील प्रश्नांची जाण म्हणूनच
यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, या भागातील कार्यक्रमांमध्ये, सुखदुःखांच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आले नाही. मात्र, तरीदेखील मला या भागातील प्रश्नांची जाण असून, त्या दृष्टीने मी काम करतो. गेली 35 वर्षे तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अनेक मंत्री पदांवर मला संधी मिळाली. त्यामुळे राज्याचे प्रश्न सोडवत असताना मी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले नाही असे वळसे पाटील म्हणाले.
निवडणुकीनंतर राजकीय समीकरणं बदलणार, गणितं जुळवायला खूप वाव ; दिलीप वळसे पाटील
या भागातील सौरंग्या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहे. परंतू हा रस्ता अधिक चांगला होण्यासाठी मुख्यमंत्री रस्ते योजनेतून एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. निवडणुकीनंतर या कामाला सुरुवात होणार असल्याचे वळसे पाटलांनी सांगितले.
जनतेच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार; वळसे पाटलांची ग्वाही
या भागातील कलमोडी प्रकल्प काही अडचणींमुळे मागे राहिला. परंतु त्या सर्व अडचणी आपण सोडवल्या आहेत. कलमोडी प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच या प्रकल्पाचे काम सुरु होईल अशी ग्वाहीदेखील वळसे पाटलांनी गावकऱ्यांना दिली. यावेळी माजी खासदार आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, अरुण गिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, सुशांत नवले, रमेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.