राष्ट्रवादीत प्रवेश करताच आढळरावांकडून मोहिते पाटलांचं कौतुक तर कोल्हेंना प्रत्युत्तर

राष्ट्रवादीत प्रवेश करताच आढळरावांकडून मोहिते पाटलांचं कौतुक तर कोल्हेंना प्रत्युत्तर

Shivaji Adhalrao Patil : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील ( Shivaji Adhalrao Patil ) यांनी आज (दि.26) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी आढळराव यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी यावेळी वैयक्तिक हेवेदावे नाही पण राजकारणात समोरासमोर भांड्याला भांड लागतच असं म्हणत मोहिते पाटील आणि आपल्या संबंधांवर स्पष्टीकरण दिले.

Lok Sabha Election: आघाडीचा धर्म पाळला जात नाही; भिवंडी, सांगलीवरून पटोलेंनी कुणाला सुनावले?

यावेळी बोलताना आढळराव म्हणाले की, मी वीस वर्षानंतर स्वगृही परतत आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले दिलीपराव मोहिते पाटलांची माझे कोणतेही वैयक्तिक हेवेदावे नाहीत ते स्वभावाने अत्यंत चांगले आहेत मात्र राजकारणात समोरासमोर भांड्याला भांड लागतच असं म्हणत यावेळी आढळराव यांनी मोहिते पाटील आणि आपल्या संबंधांवर स्पष्टीकरण दिले.

‘हाती घड्याळ बांधलं तरी शिवबंधनही तसंच राहणार’; आढळरावांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

तसेच पुढे ते म्हणाले, मात्र राजकारण म्हटलं की महत्वकांक्षा वाढतात तसेच लोकांनी आग्रह केला म्हणून मी लोकसभेला उभं राहावं म्हणून त्यातच शिवसेनेने मला बोलावलं. मला पवारांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात लढण्याचा आत्मविश्वास बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. ती निवडणूक मी जिंकली. यासह यावेळी आढळरावांनी आपल्या कामाचं लेखाजोखा मांडला.

तसेच यावेळी आढळराव यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावरून टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांना देखील प्रत्युत्तर दिलं. आढळराव म्हणाले की, माझ्या या पक्ष पक्षप्रवेशावरून माझ्यावरती बेडूक उड्या मारल्या जात आहेत. अशा प्रकारची टीका करण्यात आली. मात्र मी महायुतीचा असा उमेदवार आहे. ज्याच्या पक्षप्रवेशाला आणि उमेदवारीला दोन्ही पक्षांचा पाठिंबा आहे. तसेच मी शिवसेना या पक्षातही वीस वर्ष निष्ठेने काम केले आहे. मात्र माझे मित्र यांनी अगोदर मनसे मग शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत दोन दिवस आणि पुन्हा एकदा शरद पवार गट असा प्रवास केला आहे. असं म्हणत यावेळी आढळराव यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube