रस्त्याच्या भूमिपूजनावरूनच आजी-माजी आमदार भिडले, जुन्नरच्या आमदारांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

रस्त्याच्या भूमिपूजनावरूनच आजी-माजी आमदार भिडले, जुन्नरच्या आमदारांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे ( Sharad Sonwane) आणि राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांच्यात सतत काही ना काही वाद होत असतो. आताही या दोन आजी-माजी आमदारांचा वाद आता पुन्हा एकदा समोर आला. रस्त्याच्या भूमिपूजनावरून हे दोन आजी-माजी आमदार भिडले. यानंतर आजी-माजी आमदारांच्या समर्थकांनीही कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी केल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांच्यात हा वाद झाला. (Dispute between MLA Atul Benke and Sharad Sonawane over innugaration on the road)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विकासमाकांच्या उद्घाटन प्रसंगी शरद सोनावणे आणि अतुल बेनके एकत्र आले होते. मात्र, रस्त्याच्या भूमिपूजनावरून या दोन्ही आमदारांमध्ये शाब्दीक वादही झाला. चर्चा करायची नसेल तर मला गरज नसल्याचं शरद सोनवने यांनी बनेकेंना सुनावलं. तर रस्ता करत असतांना अडचणींवर मात करून पुढे जात असतांना कोणाची गरज नसल्याचा पलटवार बेनकेंनी केला. या शाब्दिक वादामुळं कार्यक्रमामद्ये तणाव निर्माण झाला होता. हा सर्व प्रकार जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात आज दुपारी घडला. शरद सोनवणे विरुध्द राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांच्यामधील टोकाचा राजकीय वाद पुन्हा एकदा समोर आला.

अनुराग कश्यपच्या मुलीचे एंगेजमेंट; पार्टीतील खास फोटो 

या वादानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांना शांत करतांना आळेफाटा पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. अखेर उपस्थितींना दोन्ही आमदारांमधील वाद सोडवला. मात्र, घडलेल्या या सर्व प्रकाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन आमदारांच्या वादात आमचा काय दोष? आमचा रस्ता कोण करणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube