live now
Budget 2026 LIVE : आयकर कायदे आणि कर संकलनाशी संबंधित अनेक प्रमुख घोषणा
निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर होणार आहे.
Union Budget 2026 Live Updates : संसदेत आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडं संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत. निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर होणार आहे. आज दिवसभराच्या अपडेट पाहा इथे…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपतींची भेट घेतील आणि त्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक होईल. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील.
LIVE NEWS & UPDATES
-
आयकर कायदे आणि कर संकलनाशी संबंधित अनेक प्रमुख घोषणा
नवीन आयकर कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होईल.
आर्थिक वर्ष २७- साठी अंदाज
कर्जाव्यतिरिक्त प्राप्ती: ₹३६.५ लाख कोटी
निव्वळ कर प्राप्ती: ₹२८.७ लाख कोटी
शिक्षण आणि आरोग्यासाठीचा टीसीएस दर ५% वरून २% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
सुधारित विवरणपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. नाममात्र शुल्क आकारून सुधारित विवरणपत्रे दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध असेल.
आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत
आयटीआर-१ आणि आयटीआर-२ दाखल करणारे ३१ जुलैपर्यंत दाखल करू शकतील.
नॉन-ऑडिट व्यवसाय प्रकरणे आणि ट्रस्टसाठी रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट असेल.
मालमत्ता विकणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी टीडीएस नियम बदलले
आता निवासी खरेदीदाराकडून टीडीएस कापला जाईल.
पूर्वी TAN आवश्यक होते, आता ते आवश्यक राहणार नाही.
-
परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा वाढवली
परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा ५% वरून १०% पर्यंत वाढवण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करण्यासाठी प्रोआयना परवानगी. प्रोआयना गुंतवणूक मर्यादा १०% वरून २४% पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
-
खादी आणि हातमागाला बळकटी देण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “मी मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडत आहे. खादी आणि हातमागाला बळकटी देण्यासाठी मी महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव मांडत असल्याचे सीतारमण यांनी यावेळी सांगितले.
Finance Minister @nsitharaman proposes the Mahatma Gandhi Gram Swaraj initiative to strengthen khadi, handlooms and handicrafts.#BudgetForViksitBharat | #ViksitBharatBudget | #Budget2026Akashvani | #Budget2026 | #ParliamentBudgetSession | @FinMinIndia | #Khadi pic.twitter.com/yFdvOQuiCt
— All India Radio News (@airnewsalerts) February 1, 2026
-
अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला काय मिळालं?
प्रत्येक जिल्ह्यात उच्चशिक्षणासाठी मुलींची वसतिगृह उभारणार
मुंबईत एबीजीसीची कंटेट क्रिएटिव्ह लॅब
पशुवैद्यकीय आणि हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्य
डिझाईन क्षेत्राला चालना
सरकारने एआय मिशन, R&D प्रकल्प हाती घेतले आहेत
तरुणांसाठी आरोग्य संस्थेत आम्ही काही तंत्रज्ञानात भर घालणार आहोत.
-
पर्यटनाला बळ देण्यासाठी अर्थमंत्र्यांच्या घोषणा
खगोलशास्त्राला प्रोत्साहन देण्यासाठी 20 महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळी १० हजार गाईडना प्रशिक्षण दिले जाणार त्याशिवाय कंटेंट क्रिएटर लॅबची स्थापना केली जाईल.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटलिटीची घोषणा, नॅशनस डेस्टिनेशन नॉलेज ग्रिडवर सर्व पर्यटन स्थळांचे मॅपिंग केले जाणार असून, नोकऱ्या, कंटेट क्रिएटर्स यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
-
शिक्षणासाठी अर्थमंत्र्यांच्या घोषणा
पूर्व भारतमध्ये नवे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन सुरू करणार
पाच विद्यापीठ टाउनशिप उभारणार
उद्योग कॉरिडोरच्या जवळ उभारणी होणार
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतीगृहे, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन
पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि प्रयोगशाळेचे बळकटीकरण
15 हजार शाळांमध्ये कंटेट क्रिएटर लॅब उभारणार
Animation, Gaming उद्योगाला बळ देण्यासाठी अर्थमंत्र्यांची घोषणा१५ हजार शाळांमध्ये कंटेट क्रिएटर लॅब उभारणार आहेत.
-
कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज तंत्रज्ञानामध्ये पुढील ५ वर्षांत २०,००० कोटींची तरतूद
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज (CCUS) तंत्रज्ञानामध्ये पुढील ५ वर्षांत २०,००० कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव मांडला आहे, जेणेकरून अंतिम-वापर अनुप्रयोगांमध्ये या तंत्रज्ञानाचा विस्तार करता येईल आणि उच्च सज्जता पातळी गाठता येईल.
The Union Finance Minister proposed an outlay of ₹20,000 crore over the next 5 years in Carbon Capture Utilization and Storage (CCUS) technologies to scale up and achieve higher readiness levels in end-use applications across
- Union Finance Minister @nsitharaman during Union… pic.twitter.com/2GwxxNV2eD
— PIB India (@PIB_India) February 1, 2026
-
गुजरातच्या जामनगरमध्ये वैश्विक आयुवैदिक केंद्र उभारणार
गुजरातच्या जामनगरमध्ये वैश्विक आयुवैदिक केंद्र उभारणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली.
-
वैद्यकीय क्षेत्रातील पर्यटनासाठी 5 प्रादेशिक हब
वैद्यकीय क्षेत्रातील पर्यटनासाठी ५ प्रादेशिक हब -. पीपीपी तत्त्वावर मेडिकल टुरिझम हब, वैद्यकीय, संशोधनाला प्रोत्साहन, आयुष् केंद्रे, करिअरची संधी, आरोग्यसेवांची उपलब्धता याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशात ३ नवीन अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थांची (एम्स) स्थापना करण्याची घोषणा केली आहे.
-
अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
• सेमी कंडक्टरसाठी 40 हजार कोटी
• भारताला औषध निर्मितीचे हब बनवू,
• बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद
• शुगर आणि कॅन्सरचे औषधोपचार स्वस्त
• 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर
• मुंबई- पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर
• 20 नवे जलमार्ग बनवणार
• बॅकिंग क्षेत्राच्या विकासासाठी नवी समिती
