आज देशाचा अर्थसंकल्प! पुणे, मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा
आज रविवार (दि. 1 फेब्रुवारी 2026)रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज रविवार (दि. 1 फेब्रुवारी 2026)रोजी देशाचा (Budget) अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. दरम्यान, पुणे, मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.
दिल्ली-वाराणसी कॉरिडॉरसह सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा केली आहे. आता हे ७ नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ७ नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बेंगळुरू, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलीगुडी यांचा समावेश आह.
सध्याचे कॉरिडॉर हायस्पीड करणार
देशभरात नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधण्यात येणार आहेत. अहमदाबाद-मुंबई कॉरिडॉरच्या पलीकडे हायस्पीड कॉरिडॉर बांधण्याची ही योजना आहे. याशिवाय सध्याचे कॉरिडॉर हायस्पीडमध्ये रुपांतरित करण्याची योजना आहे, जेणेकरून वंदे भारत एक्स्प्रेससारख्या गाड्या यादरम्यान चालवता येतील.
अर्थसंकल्पीय भाषणात सरकारचा पायभूत सुविधांचा रोडमॅप सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, प्रस्तावित कॉरिडॉर हे प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी सुधारतील. हे कॉरिडॉर लांब पल्ल्याच्या प्रवासातील कार्बन फूटप्रिंटदेखील कमी करतील.
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर : ग्रोथ कनेक्टर्स
मुंबई ते पुणे
पुणे ते हैदराबाद
हैदराबाद ते बंगळुरु
हैदराबाद ते चेन्नई
चेन्नई ते बंगळुरु
दिल्ली ते वाराणसी
वाराणसी ते सिलिगुडी
Budget 2026 LIVE : पुणे, मुंबईबद्दल अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा…
