Government Schemes : प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार?
Government Schemes : केंद्र सरकारकडून (Central Govt)देशातील जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. अशीच एक नवीन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी सुरु केलीय. अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Mandir)प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली.
Maratha reservation : आझाद मैदान नाही; जरांगेंना आंदोलनासाठी मुंबईबाहेरच दिला पर्याय
त्याअंतर्गत देशातील 1 कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवले जाणार आहेत. आज आपण या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? त्याचे नियम काय आहेत? हेच जाणून घेऊयात.
Pune गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बाणेरमध्ये बड्या हॉटेलांमधून 11 महिलांची सुटका
– देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरु होणार आहे.
– दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे.
– सध्या याबाबत सरकारकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत.
– ज्या कुटुंबांचे उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? :
– अर्जदार भारताचे कायमचे रहिवासी असले पाहिजेत.
– अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न 1 किंवा 1.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
– सर्व आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या सबमिट किंवा अपलोड करणे आवश्यक आहे.
– अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेशी संबंधित नसावा.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदारांना…
– अर्जदाराचे आधार कार्ड
– रहिवासी प्रमाणपत्र
– वीज बिल
– अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
– मोबाईल नंबर
– बँक पासबुक
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– शिधापत्रिका
(टीप : योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात, तरी वाचकांनी सदर माहितीची पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)