Nilesh Rane यांनी पुन्हा स्पष्टच सांगितले; मी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी…

Nilesh Rane यांनी पुन्हा स्पष्टच सांगितले; मी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी…

Nilesh Rane : माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पुन्हा एकदा आपण 2024 ची निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान गेल्या वेळी देखील त्यांनी आपण राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचं जाहिर केलं होतं. त्यानंतर त्यांची देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करत त्यांची नाराजी दूर केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णय मागे देखील घेतला होता.

Nilesh Rane यांनी पुन्हा स्पष्टच सांगितले..

आपण 2024 ची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, मी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही हे स्पष्ट करतो, या आधी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे आज परत करतो कारण आज एका चॅनलवर ही बातमी मी बघितली. मी सध्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात पक्षाचे काम करतोय आणि तिथेच करत राहणार. धन्यवाद. असं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकांबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

जाणीवपूर्वक विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे दाखल, जयंत पाटील धावले ठाकरेंच्या मदतीला

24 ऑक्टोबर म्हणजे दसऱ्यादिवशी निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. अचानक केलेल्या त्यांच्या या घोषणेने भाजपसह सर्व पक्षीय नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र 24 तासांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली. दोघांमध्येही जवळपास तीन तास चर्चा झाली. त्यानंतर चव्हाण आणि राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन चर्चा केली. जवळपास एक तास बैठक झाल्यानंतर राणे यांनी त्यांचा निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता.

कोण आहेत निलेश राणे?

निलेश राणे हे 2009 मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्येही ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. पुढे काँग्रेसपासून वेगळे होत त्यांनी वडील नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला. या पक्षाच्या माध्यमातूनही त्यांनी 2019 ची लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यातही त्यांचा पराभव झाला.

‘मोदी महापुरुष, तर मंदिर बनवा’; पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपला उपरोधिक सल्ला

यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यावर महाराष्ट्र भाजपचे सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली. शिवाय कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख म्हणूनही ते काम करत होते. पुढील 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरु होत्या. मात्र त्यापूर्वीच त्यांनी आपण 2024 ची निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube