Share Market Crashed : सेन्सेक्स 1243 अंकांनी घसरला, जाणून घ्या बाजार कोसळण्याची कारणं
Share Market Crashed : आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग शेअर्समध्ये (Banking shares)मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सेन्सेक्स (Sensex )आणि निफ्टी (Nifty)मोठ्या घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 723 अंकांच्या घसरणीसह 71,428 अंकांवर तर NSE बाजाराचा निफ्टी 212 अंकांच्या घसरणीसह 21,717 अंकांवर बंद झाला. आरबीआयच्या (RBI)पतधोरणाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात (Indian stock market)मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
Pradeep Sharma : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर आयकर विभागाचा छापा; झाडाझडती सुरू
आजच्या ट्रेडिंग सत्रातील बँकिंग शेअर्सच्या घसरणीमुळं निफ्टी बँक निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाला. निफ्टी बँक 1.76 टक्क्यांच्या घसरणीसह 45 हजार 12 वर बंद झाला. निफ्टी बँकेच्या 12 शेअर्सपैकी 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. खाजगी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली तर पब्लिक सेक्टरमधील बँकांचे शेअर्स चांगलेच वाढले. याशिवाय ऑटो, एफएमसीजी, मेटल आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरले. तथापि, तेल आणि वायू, ऊर्जा, मीडिया, आयटी क्षेत्रातील समभाग वाढीसह बंद झाले.
वडिलांची इच्छा अन् मविआची ऑफर : संभाजीराजे छत्रपती ‘खासदारकीची’ कोंडी कशी फोडणार?
इंट्रा-डेमध्ये सेन्सेक्सनं 72 हजार 450 आणि निफ्टीनं 22 हजारांचा टप्पा ओलांडला. मात्र विक्रीच्या दबावामुळं सेन्सेक्स 71 हजार 250 आणि निफ्टी 21 हजार 700 च्या खाली आला. शेअर बाजारातील घसरणीची महत्त्वाची कारणं जाणून घेऊयात.
हेवीवेट शेअर्समध्ये विक्री :
सेन्सेक्स आणि निफ्टीवर एचडीएफसी बँकेचं सर्वाधिक वर्चस्व आहे आणि ते सुमारे दोन टक्क्यांनी घसरले. त्यामुळे बेंचमार्क निर्देशांकांवर मोठा दबाव दिसला. याशिवाय इतर काही खासगी बँकांच्या शेअर्समध्येही विक्रीचा मोठा दबाव होता. चार खासगी बँकांचे शेअर्स सेन्सेक्सच्या टॉप 6 नुकसान झालेल्यांमध्ये आहेत.
सेन्सेक्स-निफ्टीमधील शेअर्समध्ये विक्री :
आज सेन्सेक्सचे फक्त 8 शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत तर निफ्टी 50 चे फक्त 15 शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. याचा अर्थ बहुतांश शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. त्यामुळे एकूण निर्देशांकावरच दबाव पाहायला मिळाला.
एफएमसीजी क्षेत्राकडून दबाव
आज बाजाराला बहुतांश क्षेत्रांचा पाठिंबा मिळाला नाही. एफएमसीजी क्षेत्राचा बाजारावर सर्वाधिक दबाव दिसून आला. एफएमसीजी क्षेत्राचा आयटीसी सेन्सेक्सवर सर्वाधिक तोटा आणि ब्रिटानिया निफ्टीवर सर्वाधिक तोटा झाला.
FII ची विक्री :
विदेशी गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या विक्रीमुळं बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला. एका ट्रेडिंग सत्रापूर्वी (दि.7) विदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी खरेदीपेक्षा मोठ्या प्रमाणात विक्री केली. बुधवारी (दि.7) विदेशी गुंतवणुकदारांनी 1691.02 कोटी रुपयांच्या शेअर्सची फक्त विक्री केली. FII ने या महिन्यात आत्तापर्यंत 2 हजार 888.51 कोटी रुपयांच्या शेअर्सची फक्त विक्री केली आहे.
देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणुकदारांनी बुधवारी 7 फेब्रुवारीला विक्रीपेक्षा खरेदीला महत्व दिलं पण ती खूपच कमी पडली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणुकदारांनी 7 फेब्रुवारीला तब्बल 327.73 कोटी रुपयांच्या शेअर्सची निव्वळ खरेदी केली. आपण संपूर्ण महिन्याचा विचार केला तर त्यांनी 3 हजार 570.96 कोटी रुपयांच्या शेअर्सची निव्वळ खरेदी केली.
एलआयसी शेअरची किंमत विक्रमी उच्चांकावर
चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच, जीवन विमा महामंडळ (LIC) चे शेअर्स सकाळच्या ट्रेडिंग सत्रामध्ये नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. LIC च्या शेअरची किंमत आज हायवर उघडली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या काही मिनिटांतच NSE वर 1,100 चा नवीन उच्चांक गाठला आहे.