पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा; वाचा, काय म्हणाले नितीश कुमार

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा; वाचा, काय म्हणाले नितीश कुमार

Bihar CM Nitish Kumar :  सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. निवडणूक आता अंतिम टप्यात आहे. 1 जून रोजी रोजी लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यासाठी होत असलेल्या प्रचारात सर्वच नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. सर्वांकडूनच आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी जोरदार बॅटींग सूरू आहे. दरम्यान, बिहारमधील दनियावा लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक विधान केलं. ज्याची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

नितीश कुमारांना महाराष्ट्रात धक्का! कपिल पाटलांकडून ‘समाजवादी गणराज्य पक्षाची घोषणा

पुन्हा मुख्यमंत्री

यावेळी बोलताना नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदा टीका केली. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना नितीश कुमार भलतच काहीतरी बोलून गेले. नरेंद्र मोदी हे पुन्हा मुंख्यमंत्री व्हावेत हीच आमची इच्छा आहे असं विधान नितीश कुमार यांनी केलं आहे. दरम्यान, आपली चूक झाली हे लक्षात येताच त्यांनी आपल्या विधानावर सारवासारव केली.

 

इकडू तिकडं

बिहारच्या राजकारणात मागील वर्षभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. नितीश कुमार यांनी अनेकदा युती आणि आघाडी करत कधी आरजेडी तर कधी भाजप अशी भूमिका बदलली आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपसोबत युती तोडत ते आरजेडीसोबत गेले. पुन्हा काही दिवसांतच ही युती तोडत ते भजपसोबत गेले. तसंच, नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याच काम हाती घेतलं होतं. परंतु, तेच आज भाजपसोबत आहेत.

 

400 चा आकडा गाठला नाही तरी… भाजपच्या जागांबाबत प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

4 हजार पार

बिहारमध्ये आम्ही सर्व ४० जागा आणि देशात ४०० जागा जिंकणार आहोत. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री होतील, म्हणजे देशाचा आणि बिहारचा विकास होईल. विरोधकांनी काहीही विकासकामे केली नाहीत. त्यांच्या काळात सांयकाळी लोक घाबरून घराबाहेर पडायचे नाहीत. आरजेडीला संधी मिळाली. मात्र, त्यांनी त्याचा काही उपयोग न करता काहीही कामे केली नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. तसंच, नितीश कुमार काही दिवसांपूर्वी एका प्रचार सभेत बोलताना 400 पार ऐवजी 4 हजार जागा आम्ही जिंकू अस म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube