लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? प्रशांत किशोरनंतर योगेंद्र यादवांचं मोठं भाकित…

लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? प्रशांत किशोरनंतर योगेंद्र यादवांचं मोठं भाकित…

Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. पाच टप्प्यातील (Lok Sabha Election 2024) मतदान झालं आहे. आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. यानंतर १ जून रोजी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदानाआधीच सत्ताधारी आणि विरोधकांकडून जिंकण्याचे दावे केले जात आहेत. यात राजकीय विश्लेषकांचाही आवाज ऐकू येत आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केंद्रात पुन्हा भाजपचं सरकार येईल असं भाकित केलं होतं. त्यांच्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचे कट्टर टीकाकार योगेंद्र यादव यांनीही अशीच भविष्यवाणी केली आहे. भाजप पुन्हा एकदा विजयी होईल असा अंदाज यादव यांनी व्यक्त केला आहे.

यादव यांनी असंही म्हटलं आहे की यंदा काँग्रेस पक्षाला शंभरपेक्षा जास्त (Congress Party) जागा मिळतील. भाजपला 240 ते 260 जागा मिळतील आणि मित्रपक्षांना 35 ते 45 जागा मिळतील. म्हणजेच एनडीएला कमीत (NDA) कमी 275 आणि जास्तीत जास्त 305 जागा मिळतील. कमीत कमी जागांचा अंदाज विचारात घेतला तरी केंद्रात भाजपचं सरकार येईल.

Madha Loksabha : फडणवीसांच्या खेळ्या अन् पवारांची चाल; माढ्यात निंबाळकर की मोहिते पाटील?

योगेंद्र यादवांचा दावा अन् प्रशांत किशोर खूश

यानंतर प्रशांत किशोर यांनी (Prashant Kishor) योगेंद्र यादव यांच्या या वक्तव्याचा एक व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. योगेंद्र यादव यांच्या मते निवडणुकीत भाजपला 240 ते 260 आणि एनडीए मित्रपक्षांना 35 ते 45 जागा मिळू शकतात. देशात सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागा मिळणे आवश्यक आहे सध्याच्या लोकसभेत एनडीए आघाडीच्या 303 जागा आहेत. आता तुम्हीच आकलन करा की कुणाचं सरकार येणार आहे. बाकी 4 जूनला तर कळणारच आहे की कोण कुणाबद्दल बोलतोय असे प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस, इंडिया आघाडील किती जागा ?

योगेंद्र यादव यांच्या मते काँग्रेसला 85 ते 100 जागा मिळू शकतात. इंडिया आघाडीला (INDIA Alliance) 120 ते 135 जागा मिळू शकतात. 2019 मधील निवडणुकीत काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे योगेंद्र यादव यांच्या मतानुसार काँग्रेसच्या जागा वाढताना दिसत आहे.

Loksabha Election : 400 पार सोडाच भाजप 250 च्या आतच! योगेंद्र यादवांचा मोठा दावा….

प्रशांत किशोरांचा दावा काय?

प्रशांत किशोर बऱ्याच दिवसांपासून सांगत आहेत की भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लोकांत काहीशी नाराजी असू शकते. पण, त्यांच्याबद्दल लोकांत इतकीही नाराजी नाही की त्यांच्या विरोधात मतदान होईल. उत्तर पश्चिम क्षेत्र भाजपाचा बालेकिल्ला आहे येथे काही जागा कमी झाल्या तरी दक्षिण, पूर्व भागात काही जागी मिळू शकतात. अशा पद्धतीने भाजपला मागील वेळी प्रमाणे 303 किंवा त्याच्या आसपास जागा मिळू शकतात. जरी भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी झाल्या तरीही 272 च्या खाली जाणार नाही. 272 जागा मिळाल्या म्हणजे केंद्रात पुन्हा भाजपाचंच सरकार येईल, असे प्रशांत किशोर एका मुलाखतीत म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज