Prashant Kishor : कर्नाटकमधील विजयामुळे Congress ने फारसं खूश होऊ नये
Congress should not be too happy after the victory in Karnataka, Prashant Kishor’s big statement : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly election) निकाल शनिवारी (13 मे) जाहीर झाले. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने (Congress) बहुमताचा जादुई आकडा गाठत भाजपवर (BJP) दणदणीत विजय मिळवला. यावेळी काँग्रेस पक्षाने 135 जागा जिंकल्या, तर भाजपला अवघ्या 66 जागांवर समाधान मानावे लागले. सततच्या पराभवानंतर कर्नाटकातील हा विजय काँग्रेस पक्षासाठी संजीवनी ठरेल, असा दावा नेते करत आहेत, त्यामुळे देशभरात विजयाचा जल्लोष सुरू आहे. मात्र आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी कर्नाटकच्या विजयाने काँग्रेसने फारसे खूश होऊ नये, असे म्हटले आहे.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयावर भाष्य केले आहे. यासोबतच काँग्रेसला महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. किशोर यांनी समस्तीपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रशांत किशोर म्हणाले की, कर्नाटकच्या विजयावर काँग्रेसने जास्त खूश होऊ नये, कारण 2013 मध्ये कर्नाटक निवडणूक जिंकल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता.
सेक्स वर्कर्सच्या मुलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार; विशेष पॉक्सो कोर्टाची टिप्पणी
यावेळी प्रशांत किशोर यांनी त्यांच्य दुखापतीवरही भाष्य केले. दुखापतीमुळे मला जवळपास महिनाभर बिहारमधील त्यांच्या ‘जन सूरज’ पदयात्रेपासून दूर राहावे लागणार आहे, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सुरू झालेली पदयात्रा आता सुमारे 15 दिवस पुढे ढकलावी लागली आहे. मात्र त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने पदयात्रा पुन्हा सूर होऊ शकते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवस या यात्रेला मुकावं लागणार असल्याची खंतही किशोर यांनी बोलून दाखवली.
कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा पेच
कर्नाटकात काँग्रेसलास्पष्ट बहुमत मिळाले असून कॉंग्रेससाठी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अशा परिस्थितीत या दोघांपैकी कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या विजयानंतर कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न सर्वांच्याच मनात येत आहे. अशातच सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरून पोस्टर वॉर सुरू झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेससमोर मुख्यमंत्रीपदाचा मोठा पेच निर्माण झाला आहे.