Narendra Modi कधीपर्यंत पंतप्रधान असणार? राजनाथ सिंहांनी एका वाक्यात केलं स्पष्ट

Narendra Modi  कधीपर्यंत पंतप्रधान असणार? राजनाथ सिंहांनी एका वाक्यात केलं स्पष्ट

Rajnath Singh Gives Hint About Narendra Modis PM Tenure : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejariwal ) यांच्या पंतप्रधान मोदी ( PM Modi ) यांच्या कार्यकाळावरून केलेल्या टीकेवर बोलताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाबद्दल मोठे विधान केलं आहे. सिंह म्हणाले की, 2024 ला देखील नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील त्याचबरोबर 2019 ला देखील मोदी हेच देशाचे पंतप्रधान असतील.

राज ठाकरेंच्या मागण्या अन् आठवलेंच्या कवितांनी गाजवली मोदींची मुंबईतील सभा; पाहा फोटो…

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता या नात्याने मी सांगू इच्छितो की, 2024 ला देखील नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील. त्याचबरोबर 2019 ला देखील मोदी हेच देशाचे पंतप्रधान असतील. कारण ज्या व्यक्तीने देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठं केलं आहे. त्या व्यक्तीला पंतप्रधान पदावरून काढले जाऊ शकत नाही. असं म्हणत राजनाथ सिंह यांनी केजरीवालांच्या विधान फेटाळून लावलं आहे.

कलम 370 हटवणाराच संविधानाचा रक्षक; मोदी मुंबईतील सभेत कडाडले

काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?

तिहार जेलमधून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले भाजप पुन्हा सत्तेत आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवणार आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाहा पंतप्रधान बनण्यास इच्छूक असल्याचाही दावा केजरीवाल यांनी केला.

त्यानंतर आज महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा (Suresh Mhatre) यांच्या प्रचारार्थ आज शरद पवारांनी (Sharad Pawar) भिंवडी येथे जाहीर सभा घेतली आहे. या जाहीर सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार हल्लाबोल करत तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा असा इशारा दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज