राज ठाकरेंच्या मागण्या अन् आठवलेंच्या कवितांनी गाजवली मोदींची मुंबईतील सभा; पाहा फोटो…

राज्यामध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारार्थ आज मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली.

त्यावेळी राज ठाकरे आणि मोदी पहिल्यांदाच एका मंचावर आले. त्यावेळी त्यांनी मोदींसमोर आपल्या विविध मागण्याची यादी वाचून दाखवत कॉंग्रेसवर टीका केली.

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी आपल्या खास कवितेच्या स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

'तमाम माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो' अशी ही गर्जना करणारे उद्धव ठाकरे यांनी आता इंडिया आघाडीच्या भीतीने ही घोषणा देण बंद केलं - देवेंद्र फडणवीस
