भारतीय जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना पाताळातूनही शोधून काढू; संरक्षणमंत्र्यांचा इशारा
Rajnath Singh : अरबी समुद्रात मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याप्रकरणी भारताने आता कठोर भूमिका घेतली आहे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना शोधून धडा शिकवल्याशिवाय भारत राहणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिला आहे. मुंबईत आयएनएस इंफाळच्या (INS Imphal) जलावतरण सोहळ्यात (Indian Navy) ते बोलत होते.
राजनाथ सिंह म्हणाले, आजकाल समुद्रातील हालचाल खूप वाढली आहे. भारताच्या वाढत्या सामर्थ्याने काही देशांना ईर्ष्या वाटू लागली आहे. अरबी आणि लाल समुद्रातील जहाजांवर ड्रोन हल्ले भारताने गांभीर्याने घेतले आहेत. भारतीय नौदलाने समुद्रावर निगराणी वाढवली आहे. भारताविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना समुद्राच्या तळातूनही शोधून काढू.
दरम्यान 23 डिसेंबर रोजी दक्षिण लाल समुद्रात दोन जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र हुती बंडखोरांच्या नियंत्रणातील येमेनमधून डागण्यात आले होते. इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यात भारतीय जहाजाचे नुकसान झाल्याचे अमेरिकेच्या यूएस सेंट्रल कमांडने म्हटले होते. यानंतर इराणने अमेरिकेचा हा दावा फेटाळून लावला होता.
कट्टर शत्रूंना धडकी भरविणारी INS Imphal भारतीय नौदलात, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्यासाठी सज्ज
स्वदेशी बनावटीच्या INS इंफाळला आज मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले. या सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. या युद्धनौकेमुळे हिंदी महासागरात भारताची ताकद आणखी वाढली आहे.
Share Bazar : शेअर बाजारात मोठी उसळी! एका दिवसात गुंतवणूकदार मालामाल…
भारतीय नौदलाची ताकद वाढेल
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, आयएनएस इंफाळ भारताची वाढती सागरी शक्ती दर्शवते. मला विश्वास आहे की INS IMPHAL इंडो-पॅसिफिक प्रदेशात आमचे “जलमेव यस्य, बलमेव तस्य” म्हणजेच ‘ज्याचे पाणी त्याची ताकद’ या तत्त्वाला अधिक बळकट करेल.