400 चा आकडा गाठला नाही तरी… भाजपच्या जागांबाबत प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
Political strategist Prashant Kishor Claim for BJP Seats in Loksabha : देशभरात सध्या लोकसभेच्या निवडणुकीची ( Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. 7 टप्प्यामध्ये मतदान पार पडल्यानंतर 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. मात्र या दरम्यान राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर ( Prashant Kishor) यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला ( BJP Seats ) किती जागा मिळू शकतील याचा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी भाजपला 2019 प्रमाणेच किंवा त्याहून काही अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी, आपोआप क्लिअर होणार Unread मेसेज
प्रशांत किशोर एका मुलाखतीमध्ये बोलत होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भाजप आणखी एकदा विजयी होईल. तसेच त्यांना 2019 प्रमाणे किंवा त्याहून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. यामागील कारण सांगायची झाली तर लोकांना भाजप विरुद्ध काही प्रमाणात राग असला तरी देखील त्यांच्याकडे भाजपाला सक्षम असा पर्याय नाही. मात्र लोकांना भाजपविषयी तेवढ्या मोठ्या प्रमाणात राग देखील असल्यास दिसत नाही. असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.
Aparshakti Khurana: अभिनेता अपारशक्ती खुराणाचा भन्नाट वर्कआऊटचा व्हिडिओ पाहिलंत का?
या मुलाखतीमध्ये किशोर यांना भाजपच्या 400 जागा जिंकण्याच्या अजेंड्यावर प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, भाजपाला 275 जागा जरी मिळाल्या तरी ते सत्तेत येणारच आहेत. तसेच 400 हा आकडा भाजप गाठू शकलं नाही. तरी देखील त्यांच्या विजयासाठी त्याचा काही परिणाम होईल. असं वाटत नाही, असं प्रशांत किशोर म्हणाले. किशोर यांचा हा अंदाज अरविंद केजरीवाल यांच्या इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याच्या दाव्यानंतर आला आहे.