आम्ही ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना पूर्वसूचना दिली होती”, बोंडी बीच हल्ल्याबाबत इस्रायलचा मोठा दावा
Bondi Beach attack या हल्ल्याची पूर्वसूचना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना दिल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
“We had given advance warning to the Australian Prime Minister“, Israel’s big claim regarding the Bondi Beach attack : ऑस्ट्रेलियातील(Austrelia) सिडनीच्या(Sydney) बोंडी बीचवर रविवारी 14 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी दोन व्यक्तींनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. हा एक दहशतवादी हल्ला होता. हे दोन हल्लेखोर पिता-पुत्र आहेत. ते मुस्लिम असून त्यांचं पाकिस्तान कनेक्शन असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या हल्ल्याची पूर्वसूचना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना दिल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
बोंडी बीच हल्ल्याबाबत इस्रायलचा मोठा दावा
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ऑस्ट्रेलियाच्या सरकारच्या धोरणांमुळे हा हल्ला झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं की, या धोरणांमुळे या आगीत आणखी तेल पडलं. तसेच आम्ही या हल्ल्याची पूर्वसूचना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांना दिली होती. कारण देशामध्ये सरकारने यहुदीविरोधी वातावरण निर्माण करण्याच्या धोरणांना बळ दिलं आहे. त्यामुळे आम्ही 17 ऑगस्ट ला पत्र लिहून याबाबत सूचना दिली होती. मात्र सरकारने ते गांभीर्याने घेतलं नाही.
ब्रेकिंग : पालिका निवडणुकांचं बिगुल आज वाजणार? राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
या पत्रामध्ये नेतन्याहू यांनी लिहिलं होतं की, 17 ऑगस्ट 2025 रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं होतं की, ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये पॅलेस्टाईन राज्याला औपचारिक मान्याता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे या हल्ल्यामध्ये आणखी तेल ओतलं गेलं. यातीन दहशतवादाला खतपाणी घातलं गेलं आहे. तसेच यहुदीविरोधी घटनांविरूद्ध कोणतीही कारवाई न करणे हे देखील या हल्ल्यामागील एक मोठं कारण आहे. असं नेतन्याहू म्हणाले आहेत.
पुण्यात चाललंय तरी काय! क्लासमध्ये शिक्षक शिकवतानाच विद्यार्थ्याचा गळा चिरला…
ऑस्ट्रेलियातील(Austrelia) स्थानिक वेळेनुसार 6:30 वाजता दोन व्यक्तींनी गोळीबार केल्याने सिडनीच्या(Sydney) बोंडी बीचवर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान एका धाडसी व्यक्तीने झाडाच्या मागे लपलेल्या एका बंदूकधाऱ्याला खाली ओढले आणि त्याच्या हातातील रायफल परत त्याच्याकडे वळवली. त्याचे हे धाडस कॅमेऱ्यात कैद झाले. ज्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल(Viral video) झाला आहे. या 15 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उभ्या असलेल्या गाड्याच्या मागे लपून बसलेला दिसून येतो. तो मागून बंधूकधाऱ्याकडे पळत जातो, त्याला मानेपासून पकडतो आणि त्याच्या हातातली रायफल हिसकावून घेतो. आणि बंदूक त्याच्याकडे वळवतो तेव्हा बंदूकधारी जमिनीवर कोसळतो.
गोळीबाराच्या या घटनेत गोळीबार(Firing) करणाऱ्यांपैकी एका जनासह 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबार करणाऱ्या दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असून याबातची माहिती एन. एस. डब्लू पोलिसांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. या गोळीबारात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले असून यात 2 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान ऑपरेशन सुरू असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
