पुण्यात चाललंय तरी काय! क्लासमध्ये शिक्षक शिकवतानाच विद्यार्थ्याचा गळा चिरला…
पुण्यातील राजगुरुनगरमध्ये खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांमध्ये गॅंगवॉर झाल्याची माहिती समोर आलीयं.
Pune news : पुण्यातील राजगुरूनगर येथे एका खाजगी क्लासमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिकवणी सुरू असतानाच एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार केले. ‘क्लासरूममधल्या एका मुलानं दुसऱ्या एका क्लासमधल्या मुलावर चाकूने हल्ला केला आणि त्याचा गळा चिरलाय’, अशी माहिती समोर आली आहे.
या घटनेबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नसून प्राथमिक माहितीनुसार खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर गॅंगवॉरमध्ये झाल्याचं समजंतय. विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकून वार करुन हल्ला केलायं. क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्याचा गळा चिरल्याची घटना घडलीयं.
हा हल्ला केल्यानंतर हल्लेखोर विद्यार्थी दुचाकीवरुन पसार झाला आहे. या घटनेत जखमी झालेल्या दुसरा विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलय. या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं असून चिंताजनक विषय बनलायं.
