ब्रेकिंग : पालिका निवडणुकांचं बिगुल आज वाजणार? राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या काही भागातील निवडणुका पार पडल्यानंतर महानगर पालिकांच्या तारखांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

  • Written By: Published:
ब्रेकिंग : पालिका निवडणुकाचं बिगुल आज वाजणार? राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

Maharashtra Local Body Election Update : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या काही भागातील निवडणुका पार पडल्यानंतर महानगर पालिकांच्या तारखांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता पालिका निवडणुकांचं बिगुलं आज वाजण्याची शक्यता असून, दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची (Maharashtra Election Commission) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आला आहे. याबाबत आयोगाने एक पत्र जारी केले आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या तारखा, मतदानाचा कालावधी तसेच निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेत मतदार यादीमधील घोळाबाबत विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्षेपांवर आयोगाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

 

 

कोणत्या 29 महापालिकेची निवडणूक होणार?

1. अहिल्यानगर महानगरपालिका
2. अकोला महानगरपालिका
3. अमरावती महानगरपालिका
4. भिवंडी निजामपूर महानगरपालिका
5. बृहन्मुंबई महानगरपालिका
6. चंद्रपूर महानगरपालिका
7. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
8. धुळे महानगरपालिका
9. इचलकरंजी महानगरपालिका
10. जळगाव महानगरपालिका
11. जालना महानगरपालिका
12. कल्याण डोंबिवली महानगरपालिका
13. कोल्हापूर महानगरपालिका
14. लातूर महानगरपालिका
15. मालेगाव महानगरपालिका
16. मीरा भाईंदर महानगरपालिका
17. नागपूर महानगरपालिका
18. नांदेड वाघाळा महानगरपालिका
19. नाशिक महानगरपालिका
20. नवी मुंबई महानगरपालिका
21. पनवेल महानगरपालिका
22. परभणी महानगरपालिका
23. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
24. पुणे महानगरपालिका
25. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
26. सोलापूर महानगरपालिका
27. ठाणे महानगरपालिका
28. उल्हासनगर महानगरपालिका
29. वसई विरार महानगरपालिका

कोणत्या 32 जि.प.निवडणूक होणार?

धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, छ.संभाजीनगर, बीड
हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

विरोधकांच्या आक्षेपावर काय बोलणार?

पत्रकार परिषदेत मतदार यादीमधील घोळाबाबत विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्षेपांवर आयोगाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, काही दिवसांपूर्वी म्हणजेच मतदार यादीतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्षाने 1नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाविरुद्ध मोठा मोर्चा काढला होता.  ‘सत्याचा विराट मोर्चा’ असे या आंदोलनाला नाव देण्यात आले होते. ज्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि इतर विरोधी नेते या मोर्चात सहभागी झाले होते. Maharashtra Local Body Election Update

लोकशाही संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आली असून, राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावे लागेल असे आवाहन करत निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर केला जातोय असा गंभीर आरोप पवारांनी केला. आजच्या एक जुटीने संयुक्त महाराष्ट्र चळवळ आठवली असे शरद पवार मोर्चाला संबोधित करताना म्हणाले होते. तर,दुबार तिबार आले तर, फोडून काढा मग पोलिसांनाकडे द्या असे थेट आदेश राज ठाकरेंनी या मोर्चात दिले होते. यावेळी राज ठाकरेंनी काढ ते कापड असे सांगत राज्यातील दुबार मतदारांचा ढीग दाखवला होता. मतदारांनी मतदान करायचं, सगळं करायचं, पण मॅच अगोदरचं फिक्स असेल तर निवडणुकीला काय अर्थ असा सवालही राज यांनी मोर्चात उपस्थित केला होता.

 

follow us