विराट कोहली एकाच धावेवर बाद, 14 वर्षीला मुलीला धक्का बसला… हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

विराट कोहली एकाच धावेवर बाद, 14 वर्षीला मुलीला धक्का बसला… हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

14 Year Old Girl Death After Virat Kohli Out : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना (Champions Trophy Final) पाहताना एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. विराट कोहली (virat kohli) एका धावेवर बाद झाल्यानंतर या मुलीला हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आणि यातच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळतेय. या मुलीच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, ती या सामन्यासाठी खूप उत्साही होती. परंतु कोहली एकाच धावेवर बाद झाल्याने, मात्र तिला मोठा धक्का बसला.

कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले, तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित (Uttar Pradesh News) केलंय. लार पोलीस स्टेशन परिसरातील राउतपर पांडे गावातील रहिवासी अजय पांडे हे देवरियाच्या दिवाणी न्यायालयात वकील आहेत. ते देवरियातील सरकारी आयटीआयजवळ राहतात. त्यांची 14 वर्षांची मुलगी प्रियांशी पांडे देवरियातील एका शाळेत शिकत होती.

बंडखोर BLA समोर पाकिस्तानी सैन्याचं आत्मसमर्पण; ‘त्या’ 6000 लष्कराची संपूर्ण कुंडली, एका क्लिकवर…

कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मार्च रोजी कुटुंबातील सर्व सदस्य भारत आणि न्यूझीलंडमधील सामना एलईडीवर पाहत होते. प्रियांशी देखील सामना पाहत होती. ती सामन्याबद्दल खूप उत्साहित दिसत होती. भारताची पहिली विकेट पडल्यानंतर जेव्हा विराट कोहली मैदानात उतरला, तेव्हा प्रियांशीला भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची आशा होती. परंतु विराट कोहली फक्त एक धाव काढल्यानंतर तो बाद झाला.

यानंतर प्रियांशी अचानक बेशुद्ध पडली. ती खाली कोसळली. कुटुंबातील सदस्यांनी तिला ताबडतोब देवरिया येथील देवराहा बाबा मेडिकल कॉलेजमध्ये नेलं. जिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

बंडखोर BLA समोर पाकिस्तानी सैन्याचं आत्मसमर्पण; ‘त्या’ 6000 लष्कराची संपूर्ण कुंडली, एका क्लिकवर…

कुटुंबातील सदस्यांच्या मते, प्रियांशी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची चाहती होती. त्याच्या फलंदाजीबद्दल 9 मार्च रोजी देखील ती खूप उत्साहित होती. भारताची पहिली विकेट पडल्यानंतर विराट कोहली मैदानात आला, पण तो एक धाव घेत बाद झाला. यामुळे प्रियांशीला मोठा धक्का बसला आणि यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातून समोर आलीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube