बंडखोर BLA समोर पाकिस्तानी सैन्याचं आत्मसमर्पण; ‘त्या’ 6000 लष्कराची संपूर्ण कुंडली, एका क्लिकवर…

Baloch Liberation Army Millitants Hijack Train In Pakistan : पाकिस्तानमध्ये (Pakistan) दहशतवाद आणि फुटीरतावादी चळवळींची मुळे खोलवर रुजलेली आहेत. दरम्यान, बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने (Baloch Liberation Army) पाकिस्तानची जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केल्याची बातमी समोर आलीय. या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी आहेत, त्यांना बलुच लिबरेशन आर्मीने ओलीस ठेवल्याची माहिती मिळतेय. या ट्रेनमध्ये 140 सैनिकही प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अपहरणानंतर काही तासांनी, बलुचिस्तान आर्मीच्या दहशतवाद्यांनी (Hijack Train In Pakistan) जफर एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांना सोडलं, तर ट्रेनमधील सर्व सैनिकांना ओलीस ठेवलं होतं.
बलुच लिबरेशन आर्मी ही संघटना बऱ्याच काळापासून बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्याचा आणि परकीय प्रभावापासून, विशेषतः चिनी गुंतवणूकीपासून आणि पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रणापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळतेय. या घटनेमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पुन्हा एकदा बीएलएच्या ताकदीवर आणि रणनीतींवर लक्ष केंद्रित झाले आहे. पण ही संघटना किती शक्तिशाली आहे आणि तिची लष्करी ताकद किती आहे? ते जाणून घेऊ या.
Video : पुण्यात तरूणाईचं चाललंय तरी काय? आईने नशा करण्यास पैसे न दिल्याने जाळल्या 13 दुचाकी
बीएलएची स्थापना आणि उद्दिष्टे
बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ची स्थापना 2000 मध्ये झाली. ही संघटना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करते. पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरुद्ध सशस्त्र संघर्षात सहभागी आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा आणि संसाधनांनी समृद्ध प्रांत आहे, परंतु तेथील रहिवाशांचा आरोप आहे की सरकार त्यांच्या संसाधनांचे शोषण करत आहे. त्यांना त्यांचे हक्क मिळत नाहीत. याच कारणास्तव, बीएलएसह इतर अनेक बलुच संघटनांनी शस्त्रे हाती घेतली आहेत.
बीएलएची लष्करी ताकद किती?
2000 मध्ये जेव्हा बीएलएची स्थापना झाली, तेव्हा त्यांची लष्करी ताकद सुमारे 6 हजार सैनिक असल्याचं म्हटलं जात होतं. कालांतराने त्याच्या सदस्यांची संख्या कमी झाली . माजिद ब्रिगेड ही बीएलएची एक विशेष आत्मघातकी पथक आहे, यामध्ये सुमारे 100 ते 150 आत्मघातकी हल्लेखोरांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या आकडेवारीवरून बीएलएच्या एकूण लष्करी ताकदीचा अंदाज लावता येतो. आकडेवारीनुसार, बीएलएकडे सध्या 1 ते दीड हजार लढाऊ विमाने आहेत. काही नवीन अहवालांमध्ये असं म्हटलंय की, बीएलए लढाऊंची संख्या कमी होऊन फक्त 600 झालीय.
अखेर धंगेकरांनी भात्यातून बाण सोडला; राऊत अन् शिंदेंच्या आरोपांवर दिलं धारदार प्रत्युत्तर
बीएलएचे डावपेच आणि हल्ले
बीएलए संघटना गनिमी युद्धाच्या रणनीती वापरते. ते पाकिस्तानी सैन्य, पोलिस आणि सरकारी संस्थांवर हल्ला करतात. बीएलए विशेषतः चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) च्या विरोधात आहे. याअंतर्गत चीनने बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलीय. बीएलए पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि इतर सुरक्षा एजन्सींना लक्ष्य करते. या संघटनेने अनेक वेळा चिनी नागरिकांवर हल्ले केलेत, यामुळे चीन आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झालाय. जरी बीएलएची ताकद पूर्वीच्या तुलनेत कमी झाली असली तरी, ती अजूनही पाकिस्तानसाठी एक मोठा धोका आहे. पाकिस्तानचे सैन्य या संघटनेला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतंय. परंतु बलुचिस्तानमधील अनेक स्थानिक लोकांकडून तिला पाठिंबा मिळतोय.