Mauritius दौऱ्यात फडणवीसांचे नव्या स्टाईलचे जॅकेट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन दिवसांच्या मॉरिशस दौर्यासाठी आज सकाळी मॉरिशस येथे आगमन झाले.

या दौर्यात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.

या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ यांची उपस्थिती असणार आहे.

मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांची सदिच्छा भेट देवेंद्र फडणवीस घेतील.

यावेळी फडणवीसांनी वेगळे जॅकेट घातलेले दिसून येत आहे.

फडणवीस हे कायम एका पद्धतीचे जॅकेट घातलेले दिसून येतात. पण यावेळी मात्र त्यांचे हे जॅकेट सगळ्यांचे लक्ष वेधून घेते आहे.
