AI थेट रस्त्यावर! पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठा तोडगा, विधानसभेत महत्वाचा निर्णय

Artificial Intelligence used to resolve traffic congestion in Pune : पुणे (Pune) शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. याचा तोडगा आता विधानसभेमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ( Yogesh Kadam) मांडला आहे. शहरातीला वाहतुक कोंडी ही पुणेकरांसाठी मोठी समस्या आहे. रस्ते आणि वाहनांची मोठी संख्या यामुळं पुणेकर नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. शहरातील वाहतुकीची समस्या (Pune Traffic) सोडवण्याचा प्रयत्न अनेकदा करण्यात आलाय, परंतु त्याला अजून देखील यश मिळालेलं नाहीये.
विधानसभेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एक माहिती सादर केलीय. यामध्ये नमूद करण्यात आलंय की, पुणे शहरातील ट्रॅफिक जॅम सोडविण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच एआयचा वापर करण्यात येणार आहे.
घोषणा अन् थापांभोवती फिरणारा अर्थसंकल्प; कवितेतून दानवेंनी काढले वाभाडे
पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई देखील करण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरामध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली विकसित करणार, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिलीय.
आमदार चेतन तुपे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना देखील मांडली होती. या लक्षवेधीच्या चर्चेमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सहभाग घेतला होता. यावर उत्तर देताना मंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय की, ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भातील कायदा अजून कडक केला जाणार आहे. या गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी म्हणून कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.
पाकिस्तानातच नाही.. भारतातही अनेक वेळा रेल्वे अपहरणाच्या घटना, कधी घडल्या जाणून घ्या
दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर अधिक लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक विभाग अन् पोलीस यंत्रणेचा समन्वय वाढविण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक नियमन, स्पीड ब्रेकर, अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर उपाययोजना आणि अपघात होत असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल सिस्टिम आणिसुरक्षात्मक उपाय करण्यावर भर देण्यात येणार आहे.