Health Tips : शरीरात प्रोटीनची कमतरता, फॉलो करा ‘ह्या’ टिप्स; होणार फायदा

Health Tips : शरीरात प्रोटीनची कमतरता, फॉलो करा ‘ह्या’ टिप्स; होणार फायदा

Health Tips :  आजच्या या बिझी लाइफस्टाइलमध्ये शरीराला (Body) योग्य आहार मिळणे खूपच आवश्यक आहे. जर शरीराला योग्य आहार मिळाला नाहीतर आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकते. यामुळे शारीरिक विकासासाठी प्रथिने (protein) खूपच महत्वाची भूमिका बजावतात . त्यामुळे शरीरात प्रथिनांचे योग्य प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुमच्या शरीरात प्रथिनांची कमतरता असेल तर तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. यामुळे त्याच्या कमतरतेची लक्षणे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. या लेखात जाणून घ्या प्रथिनांच्या कमतरतेची लक्षणे आणि त्यावर मात कशी करावी.

प्रथिनांच्या कमतरतेची लक्षणे

कोणतीही जखम बरी होण्यासाठी वेळ लागतो

जर शरीरात प्रथिनांची कमतरता असेल तर शरीरातील जखमा लवकर भरून येत नाहीत. याचा  कारण म्हणजे जखमा भरण्यासाठी शरीराला प्रथिनांची आवश्यकता असते.

अशक्तपणा आणि थकवा जाणवतो

प्रथिनांच्या कमतरतेमुळे शारीरिक कामे करण्याची क्षमता कमी होते किंवा काम करताना थकवा जाणवतो. असं तुमच्यासोबत देखील होत असेल तर हे प्रथिनांच्या कमतरतेची लक्षणे असू शकते.

त्वचा आणि केस गळणे

जर शरीरात प्रथिनांची कामरता असेल तर त्याचा परिणाम त्वचा आणि केसांवर देखील दिसून येतो. प्रथिनांच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज होणे, सुरकुत्या पडणे, बारीक रेषा आणि केस गळणे असे अनेक समस्या निर्माण होतात.

नखे तुटणे

शरीरात प्रथिनांची कमतरता असेल तर नखांवर देखील त्याच परिणाम दिसून येतो. त्याच्या कमतरतेमुळे नखे तुटायला लागतात.

मूड स्विंग

शरीरात जर प्रथिनांची कमतरता असेल तर त्याचा परिणाम मानसिकतेवर दिसून येतो. त्याच्या कमतरतेमुळे मूड स्विंग, चिडचिड यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते

जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर अनेक आजारांना दूर ठेवता येतो मात्र जर शरीरात प्रथिनांची कमतरता असेल तर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते ज्यामुळे तुम्ही सहजपणे संसर्गाचा बळी होऊ शकता.

स्नायूंच्या विकासावर मोठा परिणाम

शरीरात प्रथिनांची कमतरता असेल तर तुमच्या शरीराची रचना आणि स्नायूंच्या विकासावर मोठा परिणाम होऊ शकते. यामुळे  स्नायू कमकुवत होणे, वेदना यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

फॉलो करा ‘ह्या’ टिप्स

जर तुमच्या शरीरात देखील प्रथिनांची कमतरता असेल तर तुम्ही दूध, मांस, कडधान्ये आणि अंडी नियमितपणे खाणे सुरू करा. मात्र त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. याच बरोबर आहारात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्याचा समाविष्ट करा आणि दही, सोया ताक किंवा लहान काजू सारखे प्रथिनेयुक्त पदार्थ खा.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज