तरुणाईला कॅन्सरचं ग्रहण! ‘या’ कॅन्सरचा धोका वाढतोय; धक्कादायक कारणं समोर…

Colon Cancer Third Most Common Cancer : कर्करोग (Cancer) हा आजार पूर्वी वृद्धांमध्येच दिसून येतो, अशीच एक सर्वसामान्य धारणा होती. मात्र, नव्या संशोधनातून ही समजूत आता खोटी ठरू लागली आहे. विशेषतः कोलन कॅन्सर म्हणजेच (Colon Cancer) मोठ्या आतड्याचा कर्करोग हा आजार तरुणांमध्ये झपाट्याने वाढत आहे. 20 ते 40 वयोगटातील तरुण आणि तरुणींमध्ये (Health Tips) हा आजार वेगाने वाढत असल्याचे संशोधकांचे मत आहे.
संशोधन काय सांगते?
अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, कोलन कॅन्सर आता तरुणांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग बनला आहे. JAMA नेटवर्क आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या अभ्यासानुसार, मागील दोन दशकांत 20 ते 49 वयोगटातील तरुणांमध्ये कोलन आणि रेक्टल कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.
ब्रेकिंग! खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट; खास पैठणीचं गिफ्ट, राजकारण तापलं…
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या 2024 च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, 50 वर्षांखालील वयाच्या लोकांमध्ये कोलन कॅन्सर हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. विशेष म्हणजे 1990 नंतर जन्मलेल्यांमध्ये हा धोका 1950 मध्ये जन्मलेल्या लोकांपेक्षा दुप्पट आहे.
कोलन कॅन्सर तरुणांमध्ये वाढण्याची कारणं
– जंक फूड आणि रेड मीटचे जास्त सेवन
– फायबरयुक्त आहाराचा अभाव
– बसून काम करणे
– धूम्रपान आणि मद्यपान
– झोपेचा अभाव आणि सततचा मानसिक ताण
– आतड्यांचे इंफेक्शन
ही सगळी कारणं तरुणांच्या जीवनशैलीशी संबंधित असल्याने, कर्करोग होण्याचा धोका लवकर वाढतोय.
मतांची चोरी नाही, त्यांच्या डोक्यातील चिप अन् हार्ड डिस्क करप्ट; फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
कोलन कॅन्सरची काही सुरुवातीची लक्षणं सामान्य पचनाच्या तक्रारींसारखी वाटतात, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु ही लक्षणं धोकादायक ठरू शकतात:
– पोटात वारंवार दुखणं किंवा पेटके
– शौचात रक्त येणे
– बद्धकोष्ठता किंवा अतिसार
– थकवा, अशक्तपणा
– अचानक वजन कमी होणे
– पोट फुगणे, जडपणा
ही लक्षणं काही दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक ठरतं.
कोलन कॅन्सरपासून संरक्षण कसं कराल?
या कर्करोगापासून लांब राहण्यासाठी आपली जीवनशैली बदलणं अत्यावश्यक आहे:
– फळं, भाज्या आणि फायबरयुक्त आहार घ्या
– दररोज किमान ३० मिनिटं व्यायाम करा
– धूम्रपान आणि मद्यपान टाळा
– पाण्याचे भरपूर सेवन करा
– पोट किंवा पचनाच्या तक्रारींना दुर्लक्ष करू नका
– शक्य असल्यास सर्वसामान्य आरोग्य तपासणी दरवर्षी करून घ्या.